राज्य शासनाने शुक्रवारी काढले आदेश ; देवस्थान आणि वक्फच्या जमीनीच्या चार गुन्ह्यात आरोपी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड जिल्ह्यातील देवस्थानच्या जमीन घोटाळा प्रकरणात राज्य शासनाने अखेर उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील निलंबित केले आहे. शुक्रवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. त्यांच्यावर विविध देवस्थानाची शेकडो एकड जमीन सर्व नियम धाब्यावर बसवून विक्री केल्याचा आरोप आहे.
बीड चे तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्यावर बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि वक्फच्या अनेक एकर जमीन अवैध खालसा केल्याचा आरोपाखाली त्यांच्याविरूध्द आष्टी तालुक्यातील तीन व बीड येथील शिवाजीनगर ठाण्यात एक असे चार गुन्हे दाखल आहेत. सदरचे गुन्हें दाखल होण्यापूर्व उप जिल्हाधिकारी पाटील यांनी बीड मध्ये पुन्हा रूजू होण्यासाठी प्रयत्नशील होते. दरम्यान त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप कानावर आल्याने तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी त्यांना रूजू करून घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता
अखेर प्रकाश आघाव पाटील यांच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाने काढले असून त्यांच्यावर जमीन खालसा प्रकरणात प्रकाश आघावयांनी अनियमतिता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भूसुधारच्या जमीन खालसा प्रकरणात प्रकाश आघाव यांनी अनियमतिता केल्याचा अहवाल जिल्हाधिकाºयांनी आणि विभागीय आयुक्तांनी शासनास दिला होता. अखेर उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यावर अपेक्षानुरूप निलंबनाची कारवाई झाली आहे. जमीन घोटाळा एक बड्या अधिका-यावर झालेली ही पहलीच मोठी कारवाई आहे.