By MahaTimes ऑनलाइन – बीड |
येथील अलखैर मल्टीपर्पज फाऊंडेशन बीड संस्थेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड जोहेब अली अझहर अली यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेच्या पदाधिकाºयांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अलखैर मल्टीपर्पज फाऊंडेशन गेली अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहे. या संस्थे द्वारे विविध विधायक उपक्रम राबविण्यात येतात. अशा संस्थेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड जोहेब अली अझहर अली यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून सोमवारी त्यांना संस्थेचे अध्यक्ष इंजि. अझहर इनामदार यांनी नियुक्ती पत्र दिले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मोमीन रजियोद्दीन, सचिव आमीर खान, उपसचिव यासेर खान व सदस्य सय्यद अजीम, तौसीफ कुरेशी, गुलाम साकेब, माजेद खान, अजीम अली, आतेफ खतीब, इलियास सिद्दीकी, सय्यद अरफात, शेख रफत, शेख शाहीद आदि उपस्थित होते.
अलखैर फाऊंडेशन सारख्या विधायक कामात रचनात्मक योगदान देणाºया संस्थेने माझ्यावर जी जबाबदारी सोपविली त्यास मी खरा उतरण्याचा प्रयत्न करीन अशी अपेक्षा अॅड जोहेब अली यांनी व्यक्ती केली.