नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बालेपीर कब्रस्थान मध्ये मुस्लिम बांधवांना जनाजा नमाज अदा करण्यासाठी सभागृहाची मागणी होती. नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी ही मागणी तात्काळ पूर्ण करीत 35 लक्ष रूपयाचा निधी मंजुर केला. या कामाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.

नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी शहरात सध्या विकास कामाचा सपाटा लावला आहे. निवडणूकीत दिलेले आश्वासन असो किंवा नसो शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून ते सतत विकास कामे करीत असतात. यात ते नागरीकांची अडी अडचणी व खरी गरज ओळखता स्थानिक प्रभागाच्या नगरसेवकाकडून आलेली मागणी प्राथमिकतेने पूर्ण करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. येथील बालेपीर दर्गाह कब्रस्तान मध्ये मुस्लिम बांधवांना जनाजा नमाज अदा करण्यासाठी सभागृहाची कमतरता होती.

स्थानीय लोकप्रतिनिधींनी ही बाब नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी मुस्लिम बांधवांची अडचण लक्षात घेता कब्रस्तान परीसरात सभागृहासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले. येवढेच नव्हे तर त्यांनी सभागृह निर्माण करण्यासाठी तात्काळ 35 लाख रूपए निधिस मंजुरी देत शनिवारी याचा शुभारंभ ही केला.
या प्रसंगी बालेपीर भागातील जेष्ठ नागरिक काझी अजीज साहब, काझी नवाब साहब, हाफीज मोईन साहब, खमर भाई, इर्शाद भाई, इलियास इनामदार, मशरू पठाण, दर्गाह कमिटी चे अध्यक्ष काझी अझहर साहब, नगरसेवक इकबाल भाई, नगरसेवक मुखीद लाला, बाबा खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती शेख मोहम्मद खालेद, आबेद खान, नगरसेवक बाबा भाई, अफरोज भाई, डॉ मजीद, रिजवान सर, जाकिर पठाण, इम्रान फारोकी,अजहर भाई आदी ने केले. शहरातील विकास हा सर्वसमावेशक असतो तेंव्हा सर्वांना सोबत घेउन बालेपीर भागातील आणखी विकास कामे करण्यात येईल असे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी दिले.