व्हिडीओ कॉन्फरन्सवर होणार सुनावणी
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा कथित दुरूउपयोग व गैरवापर केल्याने त्यांना अपात्र करण्याची तक्रार राज्य शासनाकडे दाखल आहे. सदर प्रकरणात नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कडे सोमवारी दि.10 जानेवारी 2022 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सन सुनावणी होणार आहे.
बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पदाचा कथित दुरूपयोग केला असल्याने त्यांना अपात्र करण्याचे तक्रार आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केली होती. सदर प्रकरण नगरविकास कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांकडे वर्ग करण्यात आले. प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय राजकीय हेतूने असल्याचे अध्यक्षांचे म्हणणे होते. भारतीय राज्य घटनेत आणि महाराष्ट्र शासन काही नियमावली प्रकरण वर्ग करण्याचे अधिकारी फक्त मा.राज्यपाल यांना आहे. तसेच अर्धन्यायिक प्रकरणातील कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत हस्तांतरीत केली जावू शकत नाही असे नगराध्यक्षांचे न्यायालयासमोर म्हणणे होते. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाचे मा.न्यायमुर्ती एस.व्ही.गंगापुरवाला आणि मा.न्यायमुर्ती एस.जी.दीघे यांच्यासमोर झाली. उच्च न्यायालयाच्या याखंडपीठाने सदर याचिका दि. 23-12- 2021 रोजी फेटाळुन लावली.
महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीच्या तरतूदीनुसार कॅबिनेट मंत्र्यांना प्रकरण राज्यमंत्र्यांकडे वर्ग करण्याचे अधिकार आहेत. महाराष्ट्र शासन काही नियमावली हे प्रक्रियात्मक नियम शासनाच्या सोयिस्कर व्यवहारासाठी असल्या कारणाने अर्धन्यायिक प्रकरणांना देखिल लागू होतात. असा महत्त्वपुर्ण निकाल होता, तसेच बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या अपात्र प्रकरणाची सुनावणी दि.10 जानेवारी 2022 रोजी नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे ठेवण्यात आली आहे. या सुनावणी साठी नगराध्यक्ष यांना बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स ला उपस्थित राहण्याचे महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी यांनी शुक्रवार दि 7 जानेवारी रोजी नोटीसद्वारे कळविले असुन उपस्थित न राहिल्यास काही म्हणणे नाही असे गृहीत धरण्यात येईल असा नोटीशीत मध्ये म्हटले आहे.