By MahaTimes ऑनलाइन |
बीड : लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे नेते महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुस्लिम समाजाबद्दल जातीय तेढ निर्माण होईल अशी बेताल वक्तव्य करीत आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या निवडणुकीमध्ये भाजप व महायुती यांच्या विरोधात लोकांमध्ये मोठा असंतोष पसरलेला आहे. महायुतीच्या नेत्यांच्या सत्तेची मस्ती मतदार उतरवणार असे विधान शेख निजाम यांनी केले आहे.

निजाम यांनी पत्रकात पुढे म्हटले की, आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठी लोकशाही मानणारा देश असून भारताच्या संविधानाप्रमाणे भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या इच्छेनुसार धर्म स्वीकारण्याचा व धर्माचे आचरण करण्याचा पूजाअर्चा करण्याचा अधिकार दिलेला आहे. महायुतीच्या उमेदवारांना व नेत्यांना आपल्या उमेदवारांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मुस्लिम समाजाविषयी द्वेष पसरण्याचे काम करीत असून मुस्लिम समाजाच्या बाबतीत ते जाहीर सभेत जाणून बुजून खोटे वक्तव्य करीत महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम एकतेला व शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले याने व गद्दार मिंदे चे मा.खा.रवी गायकवाड यांनी मुस्लिम समाजाला फार मस्ती चढलेली आहे व वेळ पडल्यास कायदा हातात घेऊ अशी वल्गना करून धार्मिक तेढ निर्माण होईल असे आपल्या अकलेचे तारे तोडलेली आहेत व जाणून बोलून महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम एकतेला तडा निर्माण व्हावा यासाठी बेताल वक्तव्य केलेले असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या महायुतीच्या नेत्यांना उमेदवारांना सत्तेची मस्ती चढलेली आहे अशा माहायुती च्या नेत्यांची मस्ती मतदार आपल्या मतदानाच्या अधिकाराद्वारे उतरणार आहे भाजपाच्या व महायुतीच्या नेत्यांना आपला जनाधार गमावल्यामुळे अशी बेताल वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते अयशस्वी प्रयत्न करीत आहेत परंतु जागरूक मतदार त्यांच्या आशा खोट्या प्रचारांना वलगणांना भिक घालणार नसून मुस्लिम समाज कधीही जातीयवादी नव्हता व त्यामुळे जातीयवादी कोण कोण आपल्यामध्ये फूट पाडून राज्य करण्याची नीती अवलंबत आहे हे सर्व भारतातील नागरिकांना माहित झालेले आहे त्यामुळे आपल्या मतदानाद्वारे भारताची लोकशाही अजून बळकट करून हिंदू मुस्लिम एकोपा अबाधित राहावा संविधान सुरक्षित रहावे देशाच्या उन्नती व प्रगतीसाठी शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून देण्याचे काम करणार आहेत व त्यामुळे सत्तेची मस्ती चढलेल्या महायुतीच्या नेत्यांना आपली जागा दाखवणार असल्याचे पत्रक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड शहर प्रमुख शेख निजाम यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे
