पोलिस प्रशासनाची धावाधाव हेतु कळाल्याने सर्वांचा जीव भांडयात पडला
By MahaTimes ऑनलाइन – बीड |
आपल्या व्यवसायानिमित्त पुणे मुक्कामी असलेल्या व लिंबारुईदेवी (ता. बीड) येथील रहिवाशी युवकाने रविवारी सकाळी सोशल मिडीया पर लिंबारुईदेवी येथे आता बॉम्ब फुटणार, अशी पोस्ट करून गावात खळबळ उडवून दिली.
लिंबारुईदेवी चे सरपंच सारिका रुस्तुम शिंदे, उपसरपंच नारायण नांदे यांनी पिंपळनेर ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल केली. पोस्ट करणारा युवकावर कारवाई करण्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पिंपळनेर ठाण्याचे निरीक्षक सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी आपल्या कर्मचार्यांसह गावात धाव घेत माहितीची जुळवाजुळव केली. तपासाअंती सदरील पोस्ट राजकीय हेव्यादाव्यातून ही पोस्ट केली होती, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. अन् सर्वांनी सुटकेचा नि:स्वास सोडला.
‘नामदेव…नॉट रिचेबल’
राजकीय पोस्ट करून गावकर्यांची झोप उडवून देणारा नामदेव मोतीराम डोळस यास पोलिसांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याचा फोन बंद येत होता.
सध्या सोशल मिडीयावर तरूण मागचा पुढचा विचार न करता पोस्ट करीत असतात. अशा पोष्टमुळे सामाजिक शांती भंग होउन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. आम्ही नामदेव डोळस यास संपर्क करून समझ देण्यात आहोत. असे एपीआय बाळासाहेब आघाव यांनी सांगितले.