लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये 70.92 %टक्के मतदान
मतदान यंत्र स्ट्रॉंगरूम सुरक्षित ; 24 तास सीसी टीव्ही कॅमेरतून निगराणी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड लोकसभा मतदारसंघासह राज्यातील 11 मतदार संघात काल मतदान पार पडले. बीडमध्ये 41 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाकडून आलेल्या आकडेवारीनुसार बीडमध्ये 70.92 %टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान आष्टी विधानसभा क्षेत्रात झाले आहे. 4 जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ही मतमोजणी होणार असून लगेच निकाल जाहिर होणार आहे.

बीड लोकसभा मतदार संघात 11लाख 34 हजार 284 पुरुष मतदार होते. तर 10 लाख 8हजार 234 महिला मतदार आणि 29 इतर मतदार होते असे एकूण 21लाख 42 हजार 547 मतदार होते. यापैकी 8 लाख 31 हजार 245 पुरुष मतदारांनी मतदान केले. यांची 73.29% इतकी टक्केवारी आहे. तर 6 लाख 88 हजार 270 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क. यांची 68.27% इतकी टक्केवारी आहे. तर 29 पैकी 8 तृतीय पंथी मतदारांनी मतदान केले. यांची 35.51% इतकी टक्केवारी आहे. असे एकूण बीड लोकसभा मतदारसंघात 15 लाख 19हजार 523 मतदारांनी मतदान केले असून त्यांची टक्केवारी 70.92% इतकी आहे.
विधानसभा मतदारसंघानिहाय आकडेवारी
गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 42 हजार 463 एवढया पुरुषांनी तर, 1लाख 18 हजर 127 इतक्या महिलांनी मतदानाचा हक्क बजावला असुन या विधान सभा मतदार संघात 71.43% टक्के मतदान झाले आहे.

माजलगांव विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 32 हजार 931 एवढया पुरुषांनी तर, 1 लाख 09 हजार 558 इतक्या महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या विधान सभा मतदार संघात 71.61% टक्के मतदान झाले आहे.
बीड विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 33 हजार 009 एवढया पुरुषांनी तर, 1 लाख 08 महिलांनी 064 इतक्या महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या विधानसभा मतदार संघात 66.09% टक्के मतदान झालेले आहे.
आष्टी विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 53 हजार 698 एवढया पुरुषांनी तर, 1 लाख 26 हजार 050 इतक्या महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या विधानसभा मतदार संघात 74.79% टक्के मतदान झाले आहे.
केज विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 42 हजार 934 एवढया पुरुषांनी तर, 1 लाख 19 हजार 944 इतक्या महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या विधानसभा मतदार संघात 70.31% टक्के मतदान झाले आहे.
परळी विधानसभा मतदार संघामध्ये 1 लाख 26 हजार 210 एवढया पुरुषांनी तर, 1 लाख 06हजार 527 इतक्या महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदार संघात 71.31% टक्के मतदान झाले आहे.
स्ट्राँग रूमला कडक सुरक्षा
शासकीय तंत्रनिकेतन मध्ये ज्या ठिकाणी मतयंत्र ठेवलेली आहेत. त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. त्रीस्तरीय सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये बाहेरील सुरक्षा व्यवस्था, स्थानिक पोलीस बघतात. मधल्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी आहेत. तर ज्या ठिकाणी मतपेट्या सीलबंद केल्या आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे सशस्त्र जवान 24 तास कडा पहारा ठेवून आहेत. ही सुरक्षा व्यवस्था 4 जून पर्यंत राहणार आहे. 3 जूनला मतमोजणीचे “मॉक ड्रील” होईल.
निवडणूक निरीक्षक अजीमुल यांच्या मुख्य उपस्थितीत स्ट्राँग रूम सील
आज निवडणूक निरीक्षक अजीमुल यांच्या मुख्य उपस्थितीत स्ट्राँग रूम सील करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे , अपर जिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिव कुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सहा विधानसभाक्षेत्राचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. याशिवाय मागील दोन महिन्यांपासून अखंडपणे काम करणाऱ्या आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी शिक्षकांचे त्यांनी विशेष आभार मानले. प्रशिक्षणापासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सक्रियेतेने सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विविध असहकारी संस्था, विद्यार्थी, मान्यवरांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी विशेष आभार मानले. यासह सर्व बिएलओ, क्षेत्रिय अधिकारी, पोलीस व अन्य सुरक्षा दलाचे अधिकारी-कर्मचारी, वीज मंडळाचे कर्मचारी, प्रसार माध्यमातील सर्व सहकारी तसेच ग्रामपातळीवर काम करणारे ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचेही आभार व्यक्त केले आहे.
