41 उमेदवारांचे भविष्य एव्हीएम मध्ये बंद
मतदानासाठी दोन भावंडांचा शेकडो किलोमीटरचा प्रवास
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : बीड लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत प्राथमिक उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे 68% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

या यामध्ये आष्टी 69%, बीड62%, गेवराई 65%, केज 68%., माजलगाव 68%, परळी 75% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता.
बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 15 आदर्श मतदान केंद्र होते.
यामध्ये 288-गेवराई 2, 239-माजलगाव -2, 230- बीड -2 231-आष्टी -5, 232-केज -4 व 233 परळी -1 हे होते.
दिव्यांग, महिला, नव मतदार, तृतीयपंथी सर्वांनी उत्साहपूर्णपणे मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र होते, 55 महिला मतदान केंद्र, 316 परदानशी केंद्र होती.
काही बुथवरचे मशीन, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट ही बदलले
मतदानाच्या सुरुवातीला 26 बुथवरचे मशीन बदलण्यात आले. 8 कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक अडचणीमुळे बदलण्यात आले. 18 व्हीव्हीपॅट ही बदलण्यात आले.
मतदानासाठी दोन भावंडांचा शेकडो किलोमीटरचा प्रवास

बीड शहरातील अजमेर नगर येथील रहिवासी असलेल्या इमरोज अहमद आणि फेरोज अहमद या दोन भावांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास करीत आपला मतदानाचा हक्क बजावत इतर युवकांसमोर आदर्श ठेवला. इमरोज हा हैदराबादमधील एका आयटी कंपनीत काम करतो, तर फेरोज कर्नाटक राज्यातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. या दोघांनी शहरातील चंपावती शाळा मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
