23 मे रोजी चौथे आणि शेवटचे प्रशिक्षण सत्र
By MahaTimes ऑनलाइन | फेरोज अहमद
बीड : पवित्र हजला जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी खादमीन हजाज कमिटी बीडतर्फे रविवारी (दि.12) मेंदूज्वर प्रतिबंधक लसीकरण शिबिर याचे आयोजन करण्यात आले. दिवसभरात शेकडो हज यात्रेकरूंनी याचा लाभ घेतला.
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत शिबिर घेण्यात आले. ही लस (डोस) हज यात्रेकरूंसाठी अनिवार्य असल्यामुळे सर्वानीच याचा लाभ घेतला. हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
चौथे आणि शेवटचे प्रशिक्षण सत्र २३ मे ला
हज यात्रा 2024 साठी चौथे आणि शेवटचे प्रशिक्षण सत्र २३ मे रोजी अमन लॉन्स येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित केले आहे. हज यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खादमीन हुजाज कमिटीचे अध्यक्ष मुहम्मद जमील, सचिव महंमद फारूक इरफान यांनी केले आहे. तसेच इतर ठिकाणी हे शिबिर तालुका स्तरावर होणार असल्याची माहिती ही कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.