शिवसेना (ठाकरे) चे शेख निजाम आयोजित सभा बजरंग सोनवणे यांच्या विजयाची साक्षीदार ठरणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : देशासाठी नेहमी बलिदान देणारा मुस्लिम समाज लोकशाहीचे संरक्षण साठी एक हातात कुराण तर दुसऱ्या हातात संविधान घेऊन मैदानात उतरल्याने भारतीय जनता पक्ष चे पायाखालची वाळू सरकली आहे कोणत्याही परिस्थितीत भाजप येणार नाही हे आता ठरले असून येत्या 13 मे रोजी आपल्या जिल्ह्यात होणारे निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन डीपीआयचे अजिंक्य चांदणे यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे शहर प्रमुख शेख निजामचे वतीने बीड शहरात महाविकास आघाडीचे प्रमुख पक्षांचे जाहीर सभा व कॉर्नर बैठकीचे आयोजन केले जात असून या सर्वांना मतदाराकडून प्रतिसाद दिला जात आहे काल शहरातील इस्लामपुरा भागाचे बाबा चौक या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार सिराज भाई देशमुख ,राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेत्या सुशीलाताई मोराळे, समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष खमरुल इमान खान, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, प्रा. पंडित तुपे, संयोजक शेख निजाम, शप्पो दादा, इम्तियाज मनियार, खय्युम इनामदार इस्लामपूर, व भागातील युवा उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना शहर प्रमुख निजाम यांनी निवडणुकीचे महत्त्व या विषयावर उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले व येणारे 13 तारखेला रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून बजरंग सोनवणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेत्या सुशीलाताई मोराळे यांनी यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला करून सांगितले की मोदी यांनी पंतप्रधान पदाची गरीमा राखून ठेवली नाही एका पंतप्रधानाला जातीयवादी पसरणे शोभत नसून असे लोकांचे हातात देश असणे घातक आहे म्हणून चार जून रोजी तुतारी अशी वाजवायची की कमल देशभरात संपला पाहीजे यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार सिराज राज देशमुख यांनी महाविकास आघाडी व इंडिया गटबंधन देशात सत्ता स्थापन करणारा हात यंदा परिवर्तन होणार असून नागरिकांनी हातात घेतलेली निवडणूक सांभाळून घ्यावी व 13 तारीख रोजी बजरंग सोनवणे यांचे नावासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी बोलताना डीपीआयचे अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी सांगितले की सध्याचे वातावरण मुस्लिम आणि संविधान विरोधी आहे देशात जे चालले आहे ते योग्य नाही ज्या ज्या वेळे देशावर संकट आले सर्वप्रथम मुस्लिम समाजाने आपले योगदान दिले असून आजच्या काळात लोकशाही धोक्यात असल्याने मुस्लिम समाजाने एका हातात कुराण तर दुसऱ्या हातात संविधान घेऊन रक्षण करण्याची जबाबदारी घेतल्याने भाजप सरकार चिंतेत दिसून येत आहे म्हणूनच पंतप्रधान सारखे वरिष्ठ नेता खालची पातळी गाठून विरोधी भाषा करीत आहे परंतु देशाचे नागरिकांना भाजपाची नीती व निय्यत लक्षात आली असून यंदा भाजपाला सत्ता परिवर्तन पहावेच लागणार आहे सर्वांनी मिळवून ठरविल्याने ही निवडणूक नागरिकांचे हातात दिसून येत आहे येणारे 13 मे रोजी मशीन क्रमांक एकवर दोन नंबर वर बजरंग सोनवणे यांचे निवडणूक चिन्ह व नाव आहे यांच्या समोरील बटन दाबून आपण सर्वांनी आपला माणूस शेतकरी पुत्र संसदेत पाठवावे असे आवाहन केले तर माजी मंत्री सुरेश नवले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जेव्हा विकास आणि कार्याची विचारणा केली जाते त्या ठिकाणी भाजप जातीवादी तपासून आपले मार्ग मोकळे करण्याचे प्रयत्न करीत आहात परंतु नागरिकांना भाजप काय आहे आणि काय करतात हे लक्षात आले आहे बीड जिल्ह्यात भाजपाचे लोक त्यांचे उमेदवारांना पडणार असल्याची चर्चा येत आहे आहे म्हणूनच पंतप्रधान आले परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून उमेदवार पाडयाची सिग्नल जिल्ह्याचे सांगून गेलेत त्यांनी राहिलेले दिवस सुबोरीने काढून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खमरूल ईमान आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे इस्लामपूरा भागाचे युवा नेतृत्व इम् तियाज मणियार ,शेख सरफराज, खय्युम इनामदार यांनीही मार्गदर्शन केले शेख निजाम यांचे मार्गदर्शनाखाली या जाहीर सभेला यशस्वी करण्यासाठी सय्यद फहीम, शेख अक्रम, इम्तियाज मणियार ,शेख शप्पो,खय्युम इनामदार, आदींनी परिश्रम केले.
