विधानसभानिहाय दौरे सुरूच; ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद
By MahaTimes ऑनलाइन |
बीड (प्रतिनिधी) दि.8 : महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडीचे नेते शेख इरशाद बिल्डर यांनी अक्षरशः बीड लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांचे जिल्ह्यात तालुकानिहाय दौरे सुरूच असून त्यांना सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शेख इरशाद बिल्डर यांनी बीड शहरातील बालेपीर भागात शेकडो नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या.

दरम्यान बोलताना शेख इरशाद म्हणाले, स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या राजकारणात कधीही जातीपातीचे राजकारण न करता माणुसकीचा धर्म पाळण्याचे काम केले होते. त्यांचा वारसा चालविणाऱ्या पंकजाताई मुंडे ह्या सुद्धा मुंडे साहेबांप्रमाणे जाती-पातीचे राजकारण न करता माणुसकीचा धर्म पाळत आहेत. देशपातळीवर अशा नेत्यांची नितांत गरज आहे.लोकसभा निवडणुकीनिमित्त विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या पंकजाताई मुंडे यांना मत देण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी आपल्या बूथवर शंभर टक्के मतदान करून घ्या. पंकजाताईंनी केलेली विकासकामे प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवा. आपल्या बूथवर पंकजाताईंना मताधिक्य मिळेल, आपल्या जिल्ह्याच्या लौकिकाला शोभेल असे मताधिक्य पंकजाताईंना मिळेल यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. येत्या १३ मे रोजी निवडणुक चिन्ह कमळ समोरचे बटन दाबुन पंकजाताईना सर्वाधिक मताधिक्क्याने निवडुन आणण्याचा निर्धार ही शेख ईरशाद यांनी व्यक्त केला आहे.
शेख इरशाद यांचा भेटी-गाठी वर जोर
मागील कांही दिवसात इरशाद भाई यांनी बीड विधानसभा मतदारसंघासह केज, परळी, गेवराई, अंबाजोगाई आदि ठिकाणचा दौरा करुन मतदार व युवकांची गाठी- भेटी घेतल्या. यावेळी भाजप व भाजप अल्पसंख्याक आघाडी सह इरशाद मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
