बजरंग सोनवणेना जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणे घेणे नाही : अशोक हिंगे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : पार्लमेंट हे देशाचे सुरक्षा कवच आहे इथे नीतिमत्ता असणारा अशोक हिंगे सारखा उमेदवार निवडून द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केले.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. पुढे बोलताना ऍड आंबेडकर म्हणाले की राष्ट्रवादीकडे नीतिमता नावाची गोष्ट उरलेली नाही. मराठ्यांचे खरे विरोधक शरद पवारच आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन नवीन आहे 1987 पासून अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी आंदोलन केली आहेत मात्र सत्तेत असलेल्या शरद पवारांनी मराठा समाजाला गांभीर्याने घेतलेच नाही असे सांगितले शरद पवार चळवळ संपविणारा नेता आहे त्यामुळे एका माणसामुळे मराठा समाज बदनाम होऊ देऊ नका आंबेडकर यांनी मराठा समाजाला केले.
भारतीय जनता पार्टी सर्वात बरबटलेला पक्ष आहे मोदी घटना विरोधी माणूस आहे आणि सर्वात खोटारडा पंतप्रधान आहे असा पंतप्रधान मी आतापर्यंत पाहिलाच नाही मोदीच्या या अशा वागण्यामुळे देशाची असुरक्षितेकडे वाटचाल चालू आहे मोदी देशापेक्षा स्वतःला मोठे समजत आहेत त्यामुळे मोदी आणि आरएसएस प्रणित भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे असे सांगत देशाची पार्लमेंट (संसद) हे देशाचे सुरक्षा कवच आहे इथे नीतिमता असलेले म्हणजेच अशोक हिंगे सारखे तरुण तडफदार खासदार निवडून जाणे गरजेचे आहे असे मत ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले
बजरंग सोनवणेना जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणे घेणे नाही : अशोक हिंगे
शरद पवारांनी माझ्या विरोधात दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करून उभा केला जो उमेदवार स्वतःची कारखानदारी आणि स्वतःची दुकानदारी चालविण्यातच मग्न असतो त्याला जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणे घेणे नाही. मी गेल्याने एक वर्ष मराठा समाजासाठी काम केले, मुस्लिम समाजाच्या शहीन बाग आंदोलनात सहभाग नोंदवला, दलित समाजाच्या न्याय हक्क मागण्यासाठी लढलो आयत्यावेळी कारखानदारी दुकानदारी चालविणारे उमेदवार समोर येऊन जनतेला मताचे भीक मागत आहेत यांना जनतेकडे मते मागण्याचा कसलाच अधिकार नाही असेही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी सांगितले.यावेळी प्रकाश आंबेडकर, उमेदवार अशोक हिंगे पाटील, सर्वजित बनसोडे,विष्णु जाधव, तय्यब जफर, मुजम्मिल पटेल, रमेश गायकवाड, महेश निनाळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे,शैलेश कांबळे, ज्ञानेश्वर कवठेकर,डॉ नितिन सोनवणे, धम्मनंद साळवे, अँड.अनिता चक्रे,प्रा.छाया हिरवे, इंजि.विष्णु देवकाते,युनुस शेख,धम्मानंद कासारे, पुरुषोत्तम वीर,बालाजी जगतकर, अंकुश जाधव, सुदेस पोतदार भारत तांगडे,बाबुराव मस्के, प्रस्ताविक, अँड.राजेंद्र कोरडे, सुत्रसंचालन अजय सरवदे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक व सर्व जिल्ह्याचे तालुक्याचे पूर्व व पश्चिम पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्ये उपस्थित होते.
आरपीआय गवई गटाचा अशोक हिंगे यांना जाहीर पाठिंबा – माणिक वाघमारे
महायुती, महाविकास आघाडी हे दोन्ही पक्ष शेतकरी दिन दलित दुबळे यांची फसवणूक करणारे पक्ष आहेत यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊन संसदेत पाठवणारच असंही माणिक वाघमारे यांनी सांगितले.तसेच, यावेळी एआयएमआयएम चे प्रदेशाध्यक्ष एजाज बाबर, आष्टी येथील गोसावी समाजाच्या महिला नेत्या, मुस्लिम समाजाच्या महिला नेत्या यांनी वंचित बहुजन आघाडीचे जाहीर प्रवेश केला. ‘भीम आर्मी’चे सिद्धार्थ मायदळे, सचिन देशमाने यांचा हिगेंना जाहिर पाठींबा दिला. यामुळे हिंगेना चांगलेच बळ मिळाल्याचे दिसून आले.