शहर प्रमुख शेख निजाम यांच्या प्रयत्नाने शिवसेना शहरात बाप्पाना आघाडी देणार….परमेश्वर सातपुते
भावनिकता सोडून विकासासाठी महाविकास आघाडीस मतदान करा….दादासाहेब मुंढे
By MahaTimes ऑनलाइन |
बीड: जनतेला विकासाचे अमिष दाखवून नरेंद्र मोदी यांनी देशाच्या वाटोळा केला आहे येत्या निवडणुकीत भाजपा भारतातून हद्दपार होणे गरजेचे असून बीड लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजता माणूस च्या समोरच्या बटन दाबून प्रचंड मतानी विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री सुरेश नवले यांनी गांधीनगर येथील अल्कबीर हॉल या ठिकाणी शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख शेख निजाम यांच्या वतीने आयोजित बजरंग सोनवणे यांचे प्रचार निमित्त कॉर्नर बैठकीत केले यावेळी कॉंग्रेस चे माजी आमदार सिराज देशमुख ,दादासाहेब मुंढे, शिवसेना चे बीड जिल्हा प्रमुख गणेश वरेकर,परमेश्वर सातपुतेसर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे प्रदेश उपाध्यक्ष केके वडमारे, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खमरूल ईमान, सभे चे आयोजक शिवसेनेचे शहर प्रमुख शेख निजाम, दादासाहेब मुंडे, फरीद देशमुख, नगरसेवक शेख अमर, हाफेज अश्फाक, सय्यद फहीम , शप्पो दादा,इम्तियाज मणियार, कयूम इनामदार,शेख खदिर सेठ,मोमीन जुबैर,शेख पाशा आदी उपस्थित होते.यावेळी केके वडमारे यांनी सध्याचे परिस्थिती लोकशाहीवादी पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मतदान करण्याचे आवाहन करून सर्वांनी आपणच उमेदवार समजून कामाला लागण्याचे आवाहन केले तर आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केंद्र शासनाचे वतीने सत्तेच्या दुरुपयोग करून चार राज्याचे मुख्यमंत्री यांचे विरोधात करण्यात आलेली कारवाई बाबत सविस्तर माहिती सादर केली व आपले पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे बाबत झालेली कारवाईचा विरोध दर्शविण्यासाठी बजरंग सोनवणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमरुल इमान यांनी मतदानाचे महत्त्व या विषयावर बोलताना अपक्ष उमेदवारांच्या समाचार घेऊन कोणत्याही परिस्थितीत आपलं मत वायांना जाऊ देण्याचे आवाहन करून सर्व नागरिकांनी शंभर टक्के मतदान व्हावे आणि बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शासनाच्या दुरुपयोग करून भाजपाने शिवसेना पक्ष सोबतच राष्ट्रवादी पक्ष फोडून नैतिकता गमविले आहे असे पक्ष देशासाठी धोकादायक असून यांना घरी बसविण्याची ही योग्य वेळ आहे जर यावेळी चूक झाली तर भविष्यात पुन्हा संधी भेटणार नाही म्हणून आपण आपले मत वाया न जाता महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची आवाहन त्यांनी केले आहे शिवसेना चे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी जनतेशी आवाहन करून यावेळी आपले मताची ताकद दाखविण्याचे आणि या संधीचे सोने करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादासाहेब मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन करत प्रास्तपितांना त्यांची जागा दाखविण्याचे आव्हान सुद्धा केले.
बीडचे माजी आमदार सिराज देशमुख यांनी मताचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समाचार घेतला नरेंद्र मोदी सतत खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहे पंतप्रधान या पदावर असताना ते मताचे ध्रुवीकरण करण्याचे काम करीत असल्याने त्यांना या पदावर राहण्याचे अधिकार नाही नागरिकांनी मताचे माध्यमाने देश वाचविण्याचे काम करावे असे आव्हान त्यांनी केले आहे.
माजी राज्यमंत्री सुरेश नवले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत देशात भाजपाची सत्ता येऊ नये यासाठी सर्वांनी मिळवून काम करण्याची गरज आहे गरज आहे भाजपाचे सर्व नेते खोटारडे असून ते विकासावर बोलत नाही गेल्या निवडणुकीत रेल्वेमध्ये बसवून निवडणुकीचे फॉर्म दाखल करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन दिले होते परंतु रेल ही आली नाही आणि ते खासदाराला उमेदवारी पण मिळाली नाही बीडच्या रेल्वेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बजरंग सोनवणे यांची विजय गरजेची आहे तर यांनी या माध्यमाने देशात भाजपाची सत्तेला तडीपार करण्याचे आवाहन करून त्यांनी आपले मताचे विभाजन होऊ नाही यासाठी दक्षता घेण्याची सूचना सुद्धा केली या या बैठकीचे सूत्रसंचालन नगरसेवक शेख अमर यांनी केले तर आभार शिवसेनेचे शहर प्रमुख शेख निजाम यांनी व्यक्त केले.