By MahaTimes ऑनलाइन |
बीड : स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या राजकारणात कधीही जातीपातीचे राजकारण न करता माणुसकीचा धर्म पाळण्याचे काम केले होते. त्यांचा वारसा चालविणाऱ्या पंकजाताई मुंडे ह्या सुद्धा मुंडे साहेबांप्रमाणे जाती-पातीचे राजकारण न करता माणुसकीचा धर्म पाळत आहेत. देशपातळीवर अशा नेत्यांची गरज असुन येणाऱ्या १३ मे रोजी पंकजाताई यांचे निवडणुक चिन्ह कमळ समोरचे बटन दाबुन त्यांना सर्वाधिक मताधिक्क्याने निवडुन आणण्याचा निर्धार पंकजाताई समर्थक शेख ईरशाद यांनी व्यक्त केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात शेख ईरशाद यांनी म्हटले आहे की, पंकजाताई मुंडे यांनी आपल्या राजकारणात कधीही जाती-पातीचे उल्लेख केला नाही. त्यांनी पालकमंत्री असतांना सर्व जाती- जमातीचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले आहे. मुंडे साहेबांप्रमाणे त्यांचा मुस्लीम समाजावरही प्रेम असुन विकासधारेत आणण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहे.
अशा नेतृत्वाची देशात गरज असुन त्यांना निवडुन देणे सर्व जाती-जमातीसाठी लाभदायक ठरणार. विरोधी पक्षाचे त्यांच्यावर जाती- पातीच्या राजकारणाचा आरोप करत आहेत. परंतु पकंजाताई माणुसकीचा धर्म पाळणाऱ्या नेत्या आहेत. हे सिद्ध करून देण्यासाठी सर्वांनी त्यांना जास्तीत जास्त मताने निवडुन देणे गरजेचे दिसुन येते. म्हणुन येत्या १३ मे रोजी पंकजाताई यांना कमळ या चिन्हा समोरचे बटन दाबुन त्यांच्या विजयाचे शिल्पकार व्हा असे आवाहन शेख इरशाद यानी केले आहे.
