दिवसभरात अनेक ठिकाणी दिल्या भेटी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड दि.२८ (प्रतिनिधी):- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बजरंग सोनवणेंच्या प्रचारासाठी आ.संदीप क्षीरसागर दररोज दौरा करत मतदारसंघात दररोज बैठकी आणि सभा घेत आहेत. रविवार (दि.२८) रोजीही आ.क्षीरसागर यांनी बजरंग सोनवणे यांच्यासोबत दौरा अनेक ठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमांना भेटी देत संवाद साधला व आशीर्वाद घेतले.

आ.संदीप क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासह रविवारी (दि.२८) रोजी विविध ठिकाणी भेटी दिल्या. बीड तालुक्यातील तांदुळवाडी भिल्ल याठिकाणी श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथील नारळी सप्ताहास भेट दिली व गडाचे महंत ह.भ.प.विठ्ठल महाराज यांचे आशिर्वाद घेतले. पेंडगाव येथे जैन धार्मिय तेरापंथ चे आचार्य युगप्रधान श्री महाश्रमणजी महाराज साहब यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.
तसेच गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे श्री क्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहास भेट देऊन ह.भ.प. शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाचे श्रवण करुन आशिर्वाद घेतले. दरम्यान याठिकाणी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली होती. आ.संदीप क्षीरसागर व बजरंग सोनवणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बीड तालुक्यातील चौसाळा येथे राणुभवानी देवीच्या उत्सवानिमित्त भेट देऊन ग्रामस्थांशी आ.क्षीरसागर यांनी संवाद साधला.
