By MahaTimes ऑनलाइन |
बीड : अशोकनगर जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत शाळापूर्व तय्यारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिक्षक, पालकांना संबोधित करतांना शिक्षणाधिकारी प्रा जि. प.बीड मा. भगवान फुलारी म्हणाले की जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण मोफत व दर्जेदार असून आपण ते टिकून गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे.

मुलांना मराठी, इंग्रजी, गणिताचे बेसिक ज्ञान प्राथमिक शिक्षणात मिळाले पाहिजे. तर योजना शिक्षणाधिकारी मा.संजय पंचगल्ले यांनी मुलांना पाचवी, आठवी शिष्यवृर्ती NTS, MNS स्पर्धा परीक्षेची तयारी क्रमिक पाठ्यपुस्तकाचा वापर करून शिकवावे. आम्ही सर्व जि. प. च्या शाळेत शिकलोत तेच शिक्षण आज या पिढीला मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
शाळापूर्व तयारी मेळावा व ईद मिलाप कार्यक्रमा अंतर्गत सेवानिवृत्त केंद्र प्रमुख खान अ. रशीद, चंद्रकांत आरसूळ यांचा सत्कार मान्यवराचे हस्ते करण्यात आला. मेळावाला उप शिक्षण अधिकारी काजीं अ माजेद,गटशिक्षण अधिकारी भगवान सोनवणे,विस्तार अधिकारी माटे साहेब क्षीरसागर , भोंडवे शिक्षक नेते विजय समुद्रे, अंकुश निर्मळ, वाईकर, काजीं मुसाहेद, मोमीनअ. करीम,सय्यद रिझवान सह केंद्रातील शिक्षक, पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख शेख चांद यांनी केले. संचालन वर्षा कोरडे, आशा भारती यांनी तर आभार मुमताज सय्यद व नियोजन केंद्रीय मुख्याध्यापक शेख मुसा, शेख हुजीर यांनी मानले. शेवटी ईद निमित्त शीरखुर्मा, गोड पदार्थाचे सेवन करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
