ठेवी व त्यावरील व्याज देखील सुरक्षीत – डॉ. आदित्य सारडा यांची माहिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : रिझर्व बँकेच्या नियम व कायद्याचे योग्य रितीने पालन होत नाही, त्यामुळे ठेवीदारांचे हित बँक जोपासू शकत नाही. असा ठपका ठेवत द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने सर्व प्रकारचे व्यवहार ठप्प करावेत असे निर्बंध रिझर्व बँकेने लावले होते. त्यामुळे ९ मार्च २०२२ पासून ठेवी स्विकारणे, परत देणे, कर्ज वाटप करणे हे सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र बँकेने दोन वर्षाच्या कालावधीत केलेल्या योग्य नियोजनामुळे भारतीय रिझर्व बँकेने मंत्री बँकेवर लादलेले सर्व निर्बंध २६ फेब्रुवारी २०२४ हटवले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सुभाषचंद्रजी सारडा यांनी यांनी दिली. आता बँकेचे सर्व व्यवहार पुर्ववत सुरू होणार असून ठेवीदारांच्या ठेवी व ठेवी वरील व्याज देखील सुरक्षीत आहेत आणि बँक लवकरच कर्ज वाटप करणार असल्याचेही अध्यक्ष आदित्य सारडा म्हणाले.

डॉ. आदित्य सारडा म्हणाले की, नविन संचालक मंडळ आल्यानंतर बँकेची परिस्थिती टप्या-टप्याने सुधारली. ३१ मार्च २०२३ रोजी रिझर्व बँकेने ज्यामुळे निर्बंध लावले होते त्या सर्व तांत्रीक बाबींची पूर्तता बँकेने केलेली. त्यामुळे मंत्री बँकेवर रिझर्व बँकेने बँकींग रेग्युलेशन अॅक्ट १९५६ चे नियम ३५ (अ) नुसार लावलेले निर्बंध काढावेत असा पत्रव्यवहार सुरू केला. यावर रिझर्व बँकेने जवळपास ४ ते ५ वेळेस विविध पद्धतीने बँकेची तपासणी केली व बँकेचे वैधानिक लेखा परिक्षक यांनी ऑडीट केले होते.
बँकेवर निर्बंधांबाबतचे पत्रय येण्यापूर्वी सहामहिणे आगोदर बँकेवर प्रशासकांची नियुक्ती होती. त्यामुळे बँकेचे जवळपास १४० कोटी रूपयांच्या ठेवी ठेवीदारांनी परत घेतल्या. निर्बंध लावण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत कोण्यत्याही ठेवीदारास बँकेने ठेवी परत देण्यास नकार दिलेला नव्हता. निर्बंध लागल्यानंतर भारतीय रिझर्व बँकेने बँकेचे लायसन्स रद्द का करू नये अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी बँकेस दिली. त्यांनी सदरील नोटीस मध्ये काढलेल्या सर्व मुद्यांची बँकेने पूर्तता करून सदरची नोटीस परत घेण्याबाबत रिझर्व बँकेच्या मुख्यालयास विनंती केली व ती त्यांनी मान्य केल्याचे अध्यक्ष आदित्य सारडा म्हणाले.
ठेवीदारांची रक्कम देण्यास बँक सक्षम
६२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जून्या बँकेस कोणत्याही प्रकारचा तडा न जाता ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरून बँकेचे व्यवहार पूर्ववत सुरू होत आहेत. ज्या ठेवीदारांना आपल्या ठेवी परत हव्या असतील त्यांना त्या लगेच परत मिळू शकतात. बँकेकडे ११४ कोटी रुपयांच्या आत ठेवी आहेत. तर बँकेकडे स्वतःजवळ बँकेच्या तिजोरीत व बँकेच्या विविध ठिकाणी जवळपास 121 कोटी रुपये आहेत त्यामुळे ठेवीदारांची रक्कम देण्यास बँक सक्षम असून ठेवीदारांनि आपल्या ठेवी पुन्हा याच बँकेत ठेऊन व्यवहार करावेत आवश्यक असल्यासच ठेवीची रक्कम परत घ्यावी. आज बँकेची परिस्थिती सक्षम बँकेकडे मार्च २०२१ अखेर २०३ कोटी कर्ज येणे होते. ते आज ९० आहे. आज बँकेची परिस्थिती सक्षम असून रिझर्व बँकेच्या नियमा प्रमाणे बँकेचा सि.आर.ए. आर. ९ टक्के पाहिजे आज तो २१.६० टक्के आहे. तर बँकेचे नेटवर्थ ९१० लाख रूपये एवढे आहे. बँकेचे वसूल भागभांडवल रू. २० कोटी २८ लाख एवढे आहे.
सारडा परिवाराची परंपरा कायम
सहकार महर्षि श्री. सुभाषचंद्रजी सारडा यांनी बीड जि. मध्यवर्ती सहकारी बँक या पूर्वी section-11 मधून अशाच परिस्थितीमधून बाहेर काढली. ज्या बँकेत ठेवीदारांना एक हजार रूपये देखील परत करता येत नव्हते तिथे डॉ. आदित्य सारडा यांनी सामान्य ठेवीदारांच्या ठेवी तर परत केल्याच आणि जिल्हा परिषदेचे १२५ कोटी रूपये देखील परत दिले आणि नवीन कर्ज वाटपास सुरूवात केली. त्याच प्रमाणे पुढे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारकदास मंत्री बँकेच्या प्रशासक काळात बँकेवर लागलेले निर्बंध काढण्यास बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सुभाषचंद्रजी सारडा यांना यश आले आहे.
भारतात एकमेव मंत्री बँक
भारतीय रिझर्व बँकेने लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देऊनही रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करून रिझर्व बँकेचे लागलेले निर्बंध उठणारी मंत्री बँक भारतातील एकमेव बँक असून यापूर्वीही बँकेने ५१, ६५, ८५ टक्के लाभांश देऊन भारतात नाव केलेले आहे.
