5 कोयते, 2 मोटारसायकली आणि काही रोकडही ताब्यात घेतली, एका पिगमी एजंटासह वडवणी, धारूर, केज, युसुफवडगाव पेट्रोलपंपावर केली लुटमार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : केज तालुक्यात काल सायंकाळी पोलिसांनी कोयता गँगचा पर्दाफाश करत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 5 कोयते, 2 मोटारसायकली, मोबाईल आणि काही रोकडही ताब्यात घेतली. ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अपर अधिक्षक पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. संतोष साबळे व त्यांच्या टिमने केली.

पोलिस प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने केज तालुक्यात कारवाई करत कोयता गँगमधील विकास सावंत (रा. पुणे), अजय अशोक तांगडे, सोमनाथ चाळक, बालाजी राम लांब व सुर्यवंशी यांना ताब्यात घेतले.
या टोळीला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी वडवणी, धारूर, केज, युसुफवडगाव येथील पेट्रोलपंपावर लुटमार केल्याची आणि एका पिगमी एजंटालाही लुटल्याची कबुली दिली. गुन्हा करतांना आरोपी एकही पुरावा मागे सोडत नाहीं. मात्र या कोयता गंगकडून असे काही न दिसणारे पुरावे मागे राहिले आणि त्यावरूनच एलसीबीने सगळ्यांवर फास टाकला. सिसिटिव्ही फुटेज आणि एका बुटामुळे पोलिसांना कोयता गँगपर्वत पोहचता आले.
