भाविक भक्तांनी लाभ घ्यावा -हभप नवनाथ महाराज
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या सहाव्या पुण्यतिथी माघ शुद्ध. पौर्णिमे निमित्त श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी (ता. बीड) येथे शनिवारी (दि. 24 ) रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत ह.भ.प. भागवताचार्य रामचंद्र महाराज जगताप माजलगाव यांचे कीर्तन होणार आहे.

या किर्तनाचा व महाप्रसादाचा या परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे गुरूवर्य शांतीब्रह्म ह.भ.प.नवनाथ महाराज यांनी केले आहे. समस्त गावकरी मंडळी मन्यारवाडी ता.जि.बीड यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
पालखी सोहळा सकाळी आठ वाजता
तसेच बाबांचा पालखी सोहळा सकाळी आठ वाजता सुरू होईल व गोरक्षनाथ टेकडी येथे गर्भांद्री पर्वत प्रदक्षिणामध्ये सकाळी 9 ते 10 यावेळेत सहभागी होता येईल.
