आंतराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांची बीडकरांना मेजवानी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : दरवर्षीप्रमाणे बीडकरांना शिवजयंती च्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली. आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहर च्या परिपूर्ण नियोजनातून सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा पार पडला . यावेळी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय दर्जाच्या खेळ, प्रात्यक्षिक आणि विविध प्रकारातील सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी बीडकरांना मिळाली.

देशाच्या विविध भागातून आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या विविध संस्कृतीक कार्यक्रम बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण याठिकाणी संपन्न झाले. मागील १७ वर्षांपासून अखंडितपणे बीड शहरात विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमाच्या स्वरूपाने आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून शिवजयंती उत्सव होत आहे. यावर्षी देखील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चित्तथराक प्रात्यक्षिक, शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, महाराषट्रातील विविध भागातील ढोल पथक, केरळ ची पुरातन युद्धकला, आंतराष्ट्रीय दर्जाच्या लेजर-शो च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जीवनपट यावेळी दाखवण्यात आला.

शिवरायांचे आदर्श विचार पुढे घेऊन जाणे आपले कर्तव्य -आ.संदीप क्षीरसागर
शिवरायांचे आदर्श विचार पुढे घेऊन जाणे आपले कर्तव्य असून आपण ते अविरत करू. येणाऱ्या काळातही शिवजयंती अशाच उत्साहाने अखंडित साजरी करू अशा शब्दात बीडकरांना आ.संदीप क्षीरसागर शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान आपल्या आईच्या आठवणीने यावेळी आ.क्षीरसागर भावनिक झाले. प्रत्येक शिवजयंती ला माझी आई याठिकाणी उपस्थित असायची, ती यावेळी उपस्थित नाही परंतु इथे उपस्थित प्रत्येक मायमाऊली मध्ये मी माझी आई बघतो. जोपर्यंत यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर यांचा हात आहे. तोपर्यंत मला कोणीही पोरका करू शकत नाही अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
