जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर हे घवघवित यश संपादन केले
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास विभाग व वक्फ बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात जिल्हा वक्फ अधिकारी पदाच्या परीक्षेत बीडचा शेख शोएब मुसा हा महाराष्ट्रातून पंधरावा आला आहे.

शेख शोएब हा उच्च शिक्षित बीई सिव्हिल एमए एमएम एड, बीए बीएड नेट सेट तथा उर्दू विषयात प्रविण्या प्राप्त केलेले असून त्याने मागील पाचवर्षापासून अथक प्रयत्न करून विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. जिल्हा वक्फ अधिकारी पदाच्या परीक्षेत त्याने जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर हे घवघवित यश संपादन केले आहे.
या यशा मागे त्याची अथक मेहनत, आई-वडील, पत्नी, भाऊ-बहीण, नातेवाईक व आझाद हिंद उर्दू सेमी इंग्लिश स्कूल चे शिक्षकवृंद यांचे आशीर्वाद, स्नेह मिळाले मिळाले आहे. त्याच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
