अध्यक्षपदी दत्ता साळुंके तर उपाध्यक्षपदी सिद्दीक फारुखी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : संपूर्ण राज्यभर लक्षवेधी ठरणारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहरची कार्यकारिणी आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी दत्ता साळुंके यांची व उपाध्यक्षपदी सिद्दीक फारुखी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

आ.संदीप क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम यांनी संपन्न ठरत आलेली बीड शहराची सार्वजनिक शिवजयंती याही वर्षी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.१०) रोजी शासकीय विश्रामगृह, बीड येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर ची बैठक पार पडली.
यावर्षीची शिवजयंती अत्यंत भव्य-दिव्य असणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे. या बैठकीस अशोक रोमन, विजय पवार, भरत झांबरे, जावेद कुरेशी, भाऊसाहेब डावकर, झुंजार धांडे, बाळासाहेब गोरे, जयमल्हार बागल, राजाभाऊ साळुंखे, दादा हातागळे, गणेश जाधव यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे सर्व माजी अध्यक्ष आणि कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
