अधिगृहित घर-जमीनीचा मावेजा देण्यासाठी स्वीकारली लाच
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : तलावात गेलेल्या घरजमिनीचा मावेजा देण्यासाठी भारती अण्णासाहेब सागरे, उपजिल्हाधिकारी (वर्ग 1) भूसंपादन अधिकारी, जायकवाडी प्रकल्प,बीड यांना एका निवृत्त मंडळ अधिकाऱ्या मार्फत 5 हजार रूपयाची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली.

बीड तालुक्यातील कुंभारी येथील तक्रारदार यांचे आजोबा यांचे घर सात्रा पोत्रा तलावाच्या बुडीत क्षेत्रात संपादित झाले आहे. त्याचा मावेजा शासनाकडून दि . 9/8/2021! रोजी 5,38,965 रु पये उप जिल्हाधीकारी भूसंपादन कार्यालय, जायकवाडी प्रकल्प बीड यांचेकडे जमा झाला. तक्रारदार यांचे आजोबांचे वारसांना मावेजा मिळण्यासाठी संबधीत कार्यालयास सर्व कागदपत्रांची पुर्तता करु न देखील मावेजा मिळण्यास विलंब होत असल्याने तक्रारदार यांनी यातील आलोसे श्रीमती भारती सागरे यांची दि 23/01/2024 रोजी भेट घेतली असता त्यांनी नवनाथ प्रभाकर सरवदे, वय 60 वर्ष,सेवा निवृत्त मंडळ अधिकारी(खाजगी ईसम) यांची भेट घेऊन त्यांचेशी बोलणी करण्याचे सांगीतले.
त्यावरुन तक्रारदार यांनी नवनाथ सरवदे यांची भेट घेतली असता त्यांनी भारती सागरे यांचे वतीने 10 हजाररु पयाची लाच मागणी केली व तडजोड अंती 5 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.तक्रारदार यांनी पुन्हा लोकसेवक भारती सागरे याची भेट घेतली असता त्यांनी सरवदे यांचे लाच मागणी ला दुजोरा दिला. त्यानंतर सापळा कारवाईचे आयोजन भूसंपादन कार्यालय बीड येथे केले असता तक्रारदार यांचेकडुन नवनाथ सरवदे या खाजगी इसमाने पंचा समक्ष लाच रक्कम 5 हजार स्वीकारताच त्यास रंगेहात पकडण्यात आले. आलोसे श्रीमती भारती सागरे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत शिवाजी नगर, पोलीस स्टेशन बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सलग दुसऱ्या दिवशी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, प्र. अपर पोलिस अधीक्षक राजीव तळेकर, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, सापळा पथक – अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी ,भरत गारदे ला. प्र. वि.बीड सह सापळा पथक पोनी अमोल धस स्नेहल कोरडे, सत्यनारायण खेत्रे आदींनी केली.
