आरोपी आमेर काझीच्या अडचणीत वाढ
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येथील मिल्लीया शाळेतील बहुचर्चित अश्लील व्हिडीओ प्रकरणी मा. सत्र न्यायालयाने आरोपी शिक्षक आमेर अहमद काजी रफत अहमद याचा जामिन अर्ज बुधवारी फेटाळला आहे. यामुळे आता मागील कांही दिवसांपासुन फरार असलेल्या आमेरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मिल्लीया शाळेमध्ये काम करणारे शिक्षक आमेर अहमद काजी रफत अहमद याने अश्लील व्हिडीओ तयार करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केल्याची घटना समोर आल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणी फिर्यादी मुख्याध्यापक सय्यद अब्दुल सत्तार सय्यद अब्दुल जब्बार यांच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द बीड शहर ठाण्यात गुन्हा क्रमांक 274/2023 नोंद झाला होता. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकाने असे घृणास्पद कृत्य केल्याचे आरोप झाल्याने व सदरील व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने संपुर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती.
सदरील प्रकरणात आरोपी आमेर अहमद काजी रफत अहमद यांनी अटकपूर्व जामीन मंजुर करण्याकरीता सत्र न्यायालय, बीड येथे अर्ज दाखल केला होता. सदरील अर्ज मा. सत्र न्यायाधीश, बीड यांनी फेटाळला. सदर प्रकरणामध्ये फिर्यादी मुख्याध्यापक सय्यद अब्दुल सत्तार सय्यद अब्दुल जब्बार, मिलीया मुलांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, बीड ता.जि.बीड यांच्या वतीने बीड येथील प्रसिध्द विधीज्ञ श्री. दिनेश गोवर्धन हांगे यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने अॅड. लोखंडे यांनी काम पाहिले.
या प्रकरणामध्ये आरोपीची पत्नी हीचे शपथपत्र महत्वाचे ठरले. या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते शेख इर्शाद यांनी आवाज उठविला होता. त्याबद्दल त्यांचे सर्व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
