पालकमंत्री धनंजय मुंडेसह मान्यवरांची उपस्थिती राहणार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील बशिरगंज चौक जुने एसपी ऑफीस रोडवरील गोल्डन कॉम्पलेक्स मधील ईलाईट केअर हॉस्पीटलचे उद्या रविवारी ( दि. १४ ) रोजी दुपारी ३ वाजता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर तर आ. संदीपभैय्या क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ. सुनिल धांडे, माजी आ. सय्यद सलीम, सिराज देशमुख, डॉ. ज्योती मेटे, सीओ निता अंधारे, रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांच्यासह समाजसेवक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर शेख मजीद (मुज्जू भाई) आणि ईलाईट केअर हॉस्पीटलचे डॉ. आमेर इनामदार यांनी केले आहे.

Advt.
