मयतात घरत बापलेकासह दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : मांजरसुंबा- पाटोदा मार्गावरील ससेवाडीजवळ कंटेनर आणी पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात शुक्र वारी रात्री 8.45 वा. सुमारास झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यात दोन्हीवाहनांचे मोठे नुकसान झाले. मयत बापलेक पिकअप मध्ये बसलेले होते.

या अपघातात बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील प्रल्हाद सीताराम घरत (वय 60), नितीन प्रल्हाद घरत (वय 38) या बापलेकासह कंटेनरचा चालक गहिनीनाथ बाबूराव गर्जे (32, रा. कापसी डोईठाण ता. आष्टी), पिकअपचा चालक विनोद लक्ष्मण सानप (37, वाघिरा ता. पाटोदा) या चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार कंटेनर क्र. एमएच 46, बीएफ 5577 हा मांजरसुंब्याहून पाटोद्याकडे लोखंडी साहित्य घेऊन जात होता. त्याची समोरून येणा-या पीकअप क्र. एमएच 23 एयू 5232 सोबत समोरासमोर भीषण टक्कर झाली.
हायवे व नेकनुर पोलिस मदतीस धावले
सदर अपघाताची माहिती समजताच हायवे व नेकनुर ठाण्याच्या अधिकारी कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत मदद कार्य हाथी घेतले. मृतदेह दोन्ही वाहनात अडकून पडले होते. जेसीबीच्या मदतीने त्यांनी मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती. सदरचे वृत्त लिहीपर्यंत चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले व त्यांची ओळखही पटली होती.