विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासोबतच आपल्या कलागुणांना मंचावर सादर केले
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील सर सय्यद अहेमद खान सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन थाटात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनींनी उत्कृष्ट कलांचे सादरीकरण करून उपस्थित प्रमुख पाहुण्यांसह पालकांची मने जिंकली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर सय्यद अहेमद सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नामवंत मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासोबतच आपल्या कलागुणांना मंचावर सादर केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष सय्यद मोईनोद्दीन मास्टर, सायं. दैनिक सिटीझनचे संपादक शेख मुजीब, दैनिक किसानचे कार्यकारी संपादक अदनान खान पठाण, सा. कश्मकश व सायं. दैनिक दिव्य वार्ता चे संपादक मुहम्मद अबूबकर चाऊस, साप्ताहिक इन्साफ चे संपादक रईसखान पठाण, दैनिक अल् हिलाल व बीड संघर्ष चे संपादक खमरूल इमान खान युसुफज़ई, सायं. दैनिक अभिमान चे कार्यकारी संपादक सय्यद फिरोज अली, संस्थेचे सचिव शेख वकील अहेमद होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख अब्दुल आदिल अहमद सर यांनी केले. आभार प्रदर्शन इमरान साकिब सर यांनी केले. यावेळी सय्यद मोईन मास्टर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याचे सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी टाळ्या वाजवून दाद देत आभार व्यक्त केले.
