पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील एका विवाहितेला तिच्या वडिलांकडून चार लाख रुपये घेऊनही सासरच्यांनी घरातून हाकलून दिले. यानंतर विवाहितेने वडिलांचे घर गाठून या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाणे येथे गेवराई शहरातील व्यापारी सय्यद महेबूब युसूफ विरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

याप्रकरणी विवाहितेने पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिचे लग्न मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे १९ एप्रिल २०१५ साली बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील खडकपुरा, येथे राहणारा सय्यद महेबूब सय्यद युसूफ याच्यासोबत झाले. लग्नानंतर तिला सासरच्यांनी एक वर्ष चांगले नांदवले. या दरम्यान तिला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर तिचा नवरा सय्यद महेबूब सय्यद युसुफ, सासू शमा बेगम सय्यद युसुफ, दिर सय्यद शौकत सय्यद युसूफ सर्व रा. खडकपुरा गेवराई, ता. गेवराई, जि. बीड यांनी घर खरेदीसाठी तिला माहेरहून आई-वडिलांकडून दोन लाख रुपये मागितले. त्यास विवाहितेच्या वडिलांनी सुरुवातीला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या नवऱ्यासह सासरचे सर्व लोकांनी तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. नेहमी लाथा बुक्क्याने मारहाण करून उपाशीपोटीही ठेवू लागले. यामुळे तिने सासरच्यांचे हे वर्तन तिचे वडील रफिक अहमद खान यांना सांगितले.
यावर मुलीला सासरच्यांनी चांगले नांदवावे म्हणून त्यांना दोन लाख रुपये घर खरेदीसाठी दिले. यानंतर सासरच्या लोकांनी काही दिवस तिला चांगले नांदवले मात्र काही काळानंतर सासरच्यांनी पुन्हा व्यापारासाठी तीन लाख रुपये आई-वडिलांकडून घेऊन ये असे म्हणून विवाहितेचा शारीरिक, मानसिक त्रास देऊन पुन्हा छळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विवाहितेच्या वडिलांची पैसे देण्याची आयपत नसल्याने व तिची सासरी नांदण्याची इच्छा असल्याने ती सासरच्यांचा त्रास सहन करूनही नांदत राहिली मात्र वडिलांनी दुसऱ्यावेळी पैसे न दिल्यामुळे सासरच्यांनी तिला नोव्हेंबर २०१६ मध्ये घरातून हाकलून दिले होते म्हणून तिने वडिलांचे घर गाठून पोलीस ठाणे पेठ बीड येथे सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टात हे प्रकरण सुरू होते. कोर्टाच्या कारवाईला थांबविण्यासाठी सासरच्यांनी गेवराई येथील काही प्रतिष्ठित विवाहितेच्या वडिलांच्या घरी बीड येथे आले व त्यांनी विवाहितेच्या सासरचे लोक यापुढे त्रास देणार नाही याची हमी दिली व विवाहितेला नांदवण्यासाठी पाठविण्याची विनंती केली. प्रतिष्ठित लोकांच्या मदतीमुळे पहिल्यांदा केलेल्या कायदेशीर कारवाईत तडजोड करून कोर्टातील दावा मागे घेत विवाहिता २०१८ साली पुन्हा गेवराई येथे सासरी नांदावयास गेली. यानंतर दोन वर्ष सासरच्यांनी चांगले नांदावले मात्र त्यानंतर नवरा सय्यद महेबुब, सासू आणि दिर यांनी तीन मजली बिल्डिंग बांधण्यासाठी पुन्हा विवाहितेच्या आई-वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणून जाच जुलूम करू लागले. तेव्हा विवाहितेच्या वडिलांची पैसे देण्याची ऐपत नसल्याने विवाहिता सासरच्या लोकांचा त्रास सहन करून नांदत राहिली मात्र त्यांचा त्रास जास्त सुरू झाल्याने विवाहितेने याबद्दल वडिलांना सांगितले म्हणून वडिलांनी पुन्हा आपल्या मुलीला त्रास नको हा विचार करून त्यांच्या नावावरील जागा विकून दुसऱ्यांदा सासरच्यांना चार लाख रुपये वडिलांचे मित्र यांच्या समक्ष दिले व माझ्या मुलीला चांगले नांदवा असे सासरच्या लोकांना सांगितले. यानंतर विवाहिता सासरी नांदण्यास गेली असता तिला सासरच्यांनी दोन महिने चांगले नांदवले. त्यावेळी सासरच्यांचे गेवराई येथील घराचे बांधकाम चालू होते. दोन महिन्यानंतर सासरच्या लोकांनी पुन्हा तुझ्या वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून मानसिक व शारीरिक त्रास देऊन लहानग्या मुलीसह विवाहितेला घरातून हाकलून दिले. यानंतर विवाहिता पुन्हा तिच्या वडिलांकडे बीड येथे आली म्हणून विवाहितेचा नवरा, सासू व दिर हे विवाहितेच्या माहेरी आले व राहिलेले एक लाख रुपये ही का घेऊन आली नाहीस असे म्हणून शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने वो चापटाने मारहाण केली. त्यावेळी त्याची आई, भाऊ आणि शेजारी राहणारे नबी काका यांनी मध्यस्थी करून भांडणाची सोडवासोडव केली असता सासरच्यांनी सांगितले की, तू एक लाख रुपये घेऊन नाही आली तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी देऊन निघून गेले म्हणून विवाहितेने वडील घरी आल्यानंतर पेठ बीड पोलीस ठाण्यात नवरा सय्यद महेबूब सय्यद युसुफ, सासु , दिर सर्व रा. खडकपुरा गेवराई यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर तिन्ही आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० अंतर्गत कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा करण्यात आला आहे.
…या भामट्या पासून सावध राहावे -रफिक नाशाद
या सर्व प्रकरणामुळे व्यथित झालेल्या विवाहितेच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामुळे त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले असता तिथे त्यांची हृदय शास्त्रक्रिया करावी लागली. आठ दिवसानंतर त्यांची दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर त्यांना कळाले की, त्यांचा जावई असलेला गेवराईतील सय्यद महेबुब व त्याच्या घरचे लोक दुसरे लग्न करण्यासाठी उपवर मुली पहात आहेत म्हणून विवाहितेचे वडील रफिक नाशाद यांनी उपवर मुलींच्या आई-वडिलांना आवाहन केले आहे की, गेवराईतील या भामट्या सय्यद महेबूब पिता सय्यद युसूफ उर्फ इशरत पासून सावध राहावे.
