By MahaTimes ऑनलाइन | बीड : साई न्यूरोसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, छ. संभाजीनगर चे संचालक तथा प्रसिध्द न्युरोसर्जन डॉ. नितीन कोटेचा हे बुधवारी (दि. 6 डिसेंबर ) रोजी गेवराई व बीड शहरात उपलब्ध राहणार आहेत. हाय-टेक डायग्नोस्टीक सेंटर, गेवराई येथे सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत तर श्री. नारायणी चाईल्ड केअर युनिट, बीड येथे दुपारी 2 ते 4 वेळेत रुग्णसेवा देणार आहेत.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या जीवनशैलीमुळे मान दुखी, डोकेदुखी, मायग्रेन, हात-पायाला मुंग्या येणे, पाठीच्या मणक्याचे आजार, पॅरेलीसीसचा झटका, डोक्याला मार, ब्रेन ट्युमर, फीट येणे (अपस्मार), वारंवार चक्कर येणे, मेंदुमध्ये रक्तगाठी, लहान मुलांचे ब्रेन ट्युमर आदि व्याधिंनी ग्रासले आहे. दर दहा लोकांमध्ये आठ जण अशा व्याधिनी त्रस्त आहेत. मात्र, अनेकजन वेळेअभावी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घेण्याचे टाळतात.यामुळे सुरूवातीला किरकोळ वाटणारा त्रास असह्य झाल्यावर तज्ञ डॉक्टरांकडे धाव घेतात.
बीड जिल्ह्यातील अनेक रूग्ण छत्रपति संभाजीनगर येथे न्युरोसर्जन डॉ. नितीन कोटेचा यांच्या समर्थ नगर भागातील साई न्यूरोसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार घेतात. आपण बीड सारख्या ठिकाणी आरोग्य सेवा द्यावी यासोबतच रूग्णांचा वेळ व पैसा वाचावा या हेतुने प्रसिध्द न्युरोसर्जन डॉ. नितीन कोटेचा हे मागील काही महिन्यापासून (प्रत्येक महिण्याचा पहिला बुधवार ) व्हिजिट करीत आहेत. गरजू रूग्णांनी मोबाईल क्र. 91 8767053094 व दूरध्वनी क्र. 0240 2354200 वर संपर्क करून रूग्णाचा नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.