आरक्षण आंदोलन : महाराष्ट्र दौऱ्याला आज पासुन सुरूवात
बीड मध्ये जंगी स्वागत, एसपींची घेतली भेट
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : येत्या 24 डिसेंबरला कायदा पारित होणार आहे, सरकार वेगाने कामाला लागले आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त करीत. मी मराठा आरक्षणासाठी जीव द्यायला तैयार आहे. मराठ्यानों आरक्षण मिळेपर्यंत अशीच एकजुट ठेवा. कुणबी नोंदी सापडल्याने आपण कायदेशीर ओबीसी मध्ये आहे असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी बुधवारी बीड मध्ये पेंडगांव व पाली येथे उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांना यंदा सरकारने 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहे. आंतरवाली सराटी येथून रवाना झालेले जरांगे बुधवारी वाशी व परंडा येथे सभेला रवाना होण्यापूर्वी त्यांचे बीड तालुक्यातील पेंडगाव व पाली येथे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, बोलतांना जरांगे म्हणाले की, ‘‘आरक्षणाला विरोध करणार्यांबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. त्यांनी काहीही म्हटले तरी आम्हाला काहीच देणघेण नाही. त्यांनी सभा घेतल्या तरीही आम्हाला काहीच अडचण नाही. पण आरक्षण घेपर्यंत मराठा समाज एकत्र राहणार आणी आरक्षण मिळवणार. तर, सरकारने जागं व्हावं आणी मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे ओबीसीमधून आरक्षण द्यावे असे म्हणाले.
मी समाजाचा लेकरू असून, त्यांच्यासाठी लढत आहे. आता नोंदी मिळत असून, मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी वेळ देत आहे. यासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज एकत्र येत आहे. ठिकठिकाणी लोकं थांबवून जे काही स्वागत करत आहेत, ती वेदना आहे मराठा समाजाची. जेसीबी लावून अंगावर फुलं टाकण्याचे मी सांगितले नाही, पण समाजाचे हे प्रेम आहे. नोंदी मिळाल्यानंतर राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता आमच्या लेकरांना न्याय मिळणार आहे. म्हणून हातातील सगळे कामं सोडून समाज आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी एकत्र येत असल्याचे जरांगे म्हणाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दाखवणार असल्याचे मी सांगितले होते. त्यानुसार आता कुणबीच्या नोंदी सापडू लागल्या आहेत. मी काही उपकार केले नसून, मुलगा म्हणून आपल्या समाजासाठी प्रयत्न करत आहे. माझे हे कर्तव्य होते आणी तेच पार पाडत आहे.
मी नेता नाही, समाजाचा फक्त सेवक
मराठा समाजाने जरी मला नेते म्हणून स्वीकारले असेल, पण मी स्वत:ला कधीच नेता मानत नाही. मी फक्त सेवक आहे. नोंदी मिळाल्यापासून समाजात उत्साहाचे वातावरण असून, सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा आनंद आहे. तब्बल 70 वर्षांपासून मराठा समाजाचे वाटोळं करण्याचे काम झाले, असल्याचे देखील जरांगे म्हणाले.