राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कल्पतरूच्या नवजलसा दांडिया महोत्सवास महिलांची प्रचंड गर्दी
डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यामुळे महिलांचे विकासाचे प्रश्न सुटतील – प्राजक्ता माळी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस व कल्पतरूच्या माध्यमातून भव्य दांडिया कार्यक्रम झाला. डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यामुळे बीडमध्ये मला नारीशक्तीचे दर्शन घडले, असे सांगून इतके भव्य नियोजन असेल याची कल्पना नव्हती, असे त्या म्हणाल्या. लवकरच डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यातील महिलांसाठी मॉल उभारणार आहोत. महिनाभरात त्याची मंजुरी मिळेल, अशी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ग्वाही दिली.

डॉ.सारिका योगेश क्षीरसागर या सचिव असलेल्या कल्पतरू प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत शहरातील माने कॉम्प्लेक्ससमोरील मैदानावर शनिवारी (दि.२१) सायंकाळी महिलांसाठी भव्य नवजलसा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून आदिती तटकरे या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी या होत्या.

पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न गतीने मार्गी लागत आहेत. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिलेले अंगणवाडी बांधकामाचे प्रस्ताव शासन मंजूर करेल, असे त्या म्हणाल्या. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिलांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांनी मालिका, चित्रपट, वेबसिरिज, विविध शोद्वारे काम करतात. त्यांच्याप्रमाणे जाईल, त्या क्षेत्रात महिलांनी नाव करावे, असे आवाहन करत नवरात्रीनिमित्त आदिती तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, माजी नगराध्यक्षा डॉ. दिपाताई क्षीरसागर, कल्पतरूच्या सचिव डॉ. सारिका क्षीरसागर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड. प्रज्ञा खोसरे, युवकचे प्रदेश सरचिटणीस रुपेश बेदरे पाटील, जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे, महिला नेत्या रेखाताई फड, युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रिया डोईफोडे, मुख्याधिकारी निता अंधारे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सारिका क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचलन ज्ञानदेव काशीद यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला-पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यामुळे महिलांचे विकासाचे प्रश्न सुटतील – प्राजक्ता माळी
सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, आदिती व सारिका ही देवींचीच नावे आहेत. महिलांसाठी मांडलेले प्रश्न आदिती तटकरे ह्या तातडीने सोडवतील. त्यांच्यासह डॉ.सारिका क्षीरसागर यांनी महिलांसाठी सातत्याने काम करत रहावे. त्यांच्यामुळे या भागातील महिलांचे विकासाचे प्रश्न सुटतील, असा विश्वास व्यक्त करत बीडमधील आयोजनाचे खास कौतुक केले. दांडिया कार्यक्रमातील सोयीसुविधा प्रथमच बीडमध्ये पाहण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी नवजलसा दांडिया महोत्सवास महिला भगिनी, तरुणींचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. एवढेच नाही तर स्वतः सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी, डॉ. सारिका क्षीरसागर यासह सर्वच महिलांनी दांडियावर ठेका धरला.
