अभिनेत्री प्राजक्ता माळी, मंत्री आदितीताई तटकरेंची असणार उपस्थिती
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : नवरात्र उत्सवानिमित्त शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कल्पतरू प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि.२१) सायंकाळी नवजलसा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कल्पतरू सचिव डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे. यंदाचा हा दांडिया महोत्सव जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय ठरणार आहे.

बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात पारस नगरी मैदानावर शनिवारी सायंकाळी ५ ते ९ दरम्यान भव्य नवजलसा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई सुनील तटकरे या असणार आहेत. तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे. विविध मालिका, चित्रपट आणि वेबसिरिजमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विशेष म्हणजे महिला वर्गात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे.
कार्यक्रमामध्ये महिलांना निःशुल्क प्रवेश असणार -डॉ.सारिका क्षीरसागर
यंदाचा दांडिया महोत्सव अविस्मरणीय ठरणार आहे. या दांडिया महोत्सवात महाराष्ट्र, गुजराथी, पंजाबी, राजस्थानी वेशभुषांमध्ये दांडिया खेळता येणार आहे. तसेच, महिलांसाठी निःशुल्क प्रवेश असणार आहे. बीड शहर व ग्रामीण भागातून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कल्पतरू प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.