मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलंय. मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारनं 40 दिवसांचा वेळ मागून घेतला. आज शनिवारी या मुदतीचे 30 दिवस पूर्ण होतायत त्याच पार्श्वभूमीवर अंतरवाली-सराटीत जरांगेंची सभा होतेय. राज्यभरातील मराठा संघटनांचे प्रतिनिधी जालन्यात दाखल व्हायला सुरुवात झालीय.

या सभेसाठी 5 हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आलेत. गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाना, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आलीय. याचसंदर्भात पोलिसांनीही सुरक्षेसंदर्भात आढावा बैठकही घेतली. शांततेत सभेला येण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय. या सभेसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक 3 वेगळ्या मार्गांनी वळवण्यात आलीय.
पुरी- भाजी, ठेचा तसेच खिचडीचा नाश्ता ठिकठिकाणी उपलब्ध
आंतरवाली सराटी येथे शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची विशाल सभा होत आहे. तब्बल 160 एकरावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून येणाऱ्या मराठाबांधवांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पाच हजार स्वयंसेवकांचा ताफा मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. आंतरवालीकडे येणाऱ्या रस्त्यावर 200 एकरांमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली असून, सभेला येणारासाठी पुरी- भाजी, ठेचा तसेच खिचडीचा नाश्ता ठिकठिकाणी उपलब्ध असणार आहे. पाण्याचे शेकडो टैंकर सभास्थळी सज्ज ठेवण्यात आले आहेत. सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी तब्बल दोन हजार पोलिसाचा खडा बंदोबस्त असणार आहे.
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या महिन्यात उपोषण केले. उपोषण उधळण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पण जरागे पाटील बधले नाहीत. त्यांनी मोठ्या धैयनि उपोषण चालू ठेवले. अखेर राज्य सरकारने नमते घेत जरांगे पाटील याच्याकडून महिनाभराची मुदत मागून घेत उपोषणाच्या कोंडीतून मान सोडवून घेतली, उपोषण थांबवले असले तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगत मनोज जरांगे यानी संपूर्ण राज्याचा दौरा केला. ठिकठिकाणी मराठा समाजाशी संवाद साधत त्यानी आपली आरक्षणाची मागणी ठामपणे लावून धरली. या दौयाचा समारोप आंतरवाली सराटी येथे 14 ऑक्टोबरला विशाल सभेने होणार असल्याचे त्यांनी उपोषण सोडतानाच जाहीर केले होते, तेव्हापासून या सभेची जय्यत तयारी करण्यात येत होती.
अशी आहे वाहतूक व्यवस्था
आंतरवाली सराटीला येण्यासाठी एकूण तीन महामार्ग आहेत. पुणे, नगर, पैठण, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथून येणारांनी धुळे-सोलापूर महामार्गावरून पाचोडमार्गे यावे. या वाहनांची व्यवस्था वडीगोद्रीसह दोदडगाव, टाका, नालेवाडी रामगव्हाण येथे करण्यात आली आहे.
नांदेड, परभणी, घनसावंगीमार्गे येणाऱ्या वाहनांसाठी बाजार समितीच्या आवारात पार्किंगची सोय करण्यात आली आहे..
बीड, सोलापूर, लातूरसह त्या भागातून येणाऱ्या वाहनांची पार्किंग शहागड, वडीगोद्री, बाजार समितीत असणार आहे.
लहान मुलांसाठी दूध वाहनाच्या दुरुस्तीचीही सोय आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी राज्यभरातून येणाऱ्या मराठाबांधवांसाठी ठिकठिकाणी पुरी- भाजी, ठेचा, खिचडीची सोय करण्यात आली आहे. चहाचे स्टॉलही असणार आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी दूधही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सभेसाठी मोठ्या प्रमाणावर वाहने येणार असल्याने त्यात काही बिघाड झाल्यास घनसावंगीच्या जवळ मोफत दुरुस्तीची सोय उपलब्ध असणार आहे.