गर्दीचा उच्चांक गाठणारी सभा, मोदी सरकारवर सडकून टीका
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून आमचा लढा विचारसरणीच्या विरोधात आहे भारतातील कोणताच धर्म धोक्यात नाही, तर भारतातील आरक्षणवादी धोक्यात आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार उदासीन असून केवळ वंचित बहुजन आघाडीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बीड येथे मांडले.

बीड शहरात 11 ऑक्टोबर रोजी लढाई वंचितांच्या सत्तेची ही महासभा झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदारॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेच्या मंचावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे, किशन चव्हाण, सर्वजीत बनसोडे, अनिल जाधव, विष्णू जाधव, अमित भुईगळ, विष्णू जाधव, रमेश गायकवाड, संतोष सुर्यवंशी, दीपक डोके, अमोल लांडगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
महासभेला मार्गदर्शन करताना ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, भाजपने देशाची वाट लावली आहे. भारतातील धर्म धोक्यात नसून भारतातील सगळे आरक्षणवादी धोक्यात आहेत, असे स्पष्ट मत बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले. गेल्या पंधरा दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या महासभेची तयारी सुरू होती. बुधवारी बीडमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीतील प्रत्येक पदाधिकाऱ्याने बीडच्या आजी-माजी नेत्यांसह सत्तेत असलेले किंवा नसलेले या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
बीड जिल्ह्यातील नेत्यावर टीकास्त्र सोडत मोठे जिल्ह्याचा कसा विनाश केला यावर वंचितच्या नेत्यांनी सडेतोड भाष्य केले. बाळासाहेब आंबेडकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मोबाईल टॉवरच्या रेंज गेल्याने सरकारचे आभार मानत कोपरखळ्या मारल्या. तर मोदी सरकारवर सडकून टीका केली. त्याबरोबरच काँग्रेसही त्यांनी टोकावरच ठेवत राहुल गांधीवर अनेक आरोपही यात केले. राहुल गांधींना काँग्रेसच्या लोकांना सल्लाही देण्यासाठी त्यांनी वेळ सांगितला आहे तर आरएसएस वाल्यांनो तुम्ही मोदींना आत्ताच हिमालयात पाठवा देशाचे फार मोठे भलं होईल असं म्हणत मोदींवर टीका केली आहे. तर काँग्रेसवाले राहुल गांधींचे भरभरून गुणगान गातात मात्र काँग्रेस वाल्यांनो राहुल गांधीला निर्णय घेण्याची शिकवा असं म्हणत राहुल गांधीवरही निशाणा साधला आहे.
या सभेत निवडणुकीत होणाऱ्या सभांवर जशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात त्या पद्धतीने राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस यांचा या सभेत चांगलाच समाचार घेतला. भारतातील कोणताच धर्म धोक्यात नाही, तर भारतातील आरक्षणवादी धोक्यात आहेत, असे भाष्य केले.
