हिंदू-मुस्लिम बांधवांची उपस्थिती
हजरत मोहम्मद पैगंबर (सल.अलै.) यांच्या जन्मोत्सवानिमित्त शनिवारी शहरात परंपरेनुसार जुलूस काढण्यात आला. सिरत कमेटी व केजीएन ग्रुप आयोजित जुलूस व इतर धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडले.

इस्लामिक तिथी 12 रब्बील अव्वल हा दिवस ईद-ए-मिलाद म्हणुन जगभरात साजरा केला जातो. यंदा गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादुन्नबी हे दोन्ही त्योहार एकाच दिवशी आल्याने सिरत कमिटी व केजीएन ग्रुपच्या वतीने 28 सप्टेंबर ऐवजी 30 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त जुलुस काढण्यात आला. केजीएन गु्रपचे प्रदेशाध्यक्ष जहीर कादरी यांच्या नेतृत्वाखाली हजरत शहेनशाह वली दर्गा येथुन जुलूस प्रारंभ झाला. हा जुलूस शहरातील कंकालेश्वर मंदीर परीसर, चांदणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, बुंदेलपुरा, राजूरीवेस, बशीरगंज, जुने एसपी आॅफिस, गुलजारपुरा, अजीजपुरा, कागदीवेस मार्ग आदि मुख्य रस्त्यावरून मार्गक्र मण करीत जुनाबाजार येथील खादरपाशा मस्जीद येथे पोहचला व तेथे दरूद व फातेहा पठण करून जुलुस चा समापन करण्यात आला. नंतर शहेंशाह वली दर्गा येथे लंगर-ए-आम कार्यक्रम संपन्न झाला. याचा हजारो लोकांनी लाभ घेतला.
दरम्यान बशीरगंज चौकात मिरवणूक आल्यानंतर आ. संदिप भैय्या क्षीरसागर, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, डीवायएसपी संतोष वाळके, डॉ. ज्योतीताई मेटे, राकांपा युवा नेते योगेश क्षीरसागर, एमआईएम चे जिल्हाध्यक्ष शफीक भाऊ, आदिंनी उपस्थित राहून केजीएन ग्रुपचे अध्यक्ष जहीर शहा कादरी यांच्यासह मुस्लिम ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी अकबर खान, हुमेर खान, जावेद भाई, कलीम राज हे उपस्थित होते. या मिरवणुकीतून हिंदू-मुस्लिम बांधवानी एकत्रित सहभागी होवून भाईचाराचा संदेश दिला. या मिरवणूकीत मक्का मिदना येथील प्रतिकृती सर्वाचे लक्ष वेधून घेणाºया ठरल्या.
