बीड : मुहम्मद पैगंबर सल्ललल्लाहू अलैही व सल्लम यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक (जुलूस) शनिवारी ( 30 सप्टेंबर) रोजी निघणार असून याच दिवशी मिरवणूक च्या समापनानंतर शहिंशाहवली दर्गा येथे लंगर ए आम (जेवण) चे नियोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जेवणाचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन केजीएन ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जहीर कादरी आणि अकबर खान यांनी केले आहे.
यावर्षी ईद-ए-मिलादुन्नबी २८ सप्टेंबर रोजी आली आहे. परंतु त्याच दिवशी गणपती विसर्जन असल्यामुळे जिल्हाधिकारी साहेबा, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि शांतता कमिटीने विनंती केली की, ईद-ए-मिलादुन्नबी पुढे ढकलावी. हिंदू बांधवांच्या इच्छेनुसार गणपती विसर्जन २८ सप्टेंबर रोजी साजरे करण्याचे ठरले. जिल्हा प्रशासन आणि हिंदू बांधवांच्या विनंतीला मान देऊन दिनांक २८ सप्टेंबर ऐवजी ईद-ए-मिलादुन्नबी दोन दिवसाने पुढे ढकलून दिनांक ३० सप्टेंबर शनिवार रोजी साजरी करण्याचे ठरविण्यात आले. म्हणून २८ सप्टेंबरला असलेली ईद-ए-मिलादुन्नबीची सार्वजनिक सुट्टी ३० सप्टेंबर शनिवार रोजी देण्यात यावी. अशी मागणी केजीएन ग्रुप कडून जिल्हाधिकारी साहेबाना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
ईद-ए-मिलादुन्नबी ची मिरवणूक (जुलूस) शनिवारी सकाळी 8.30 वाजता दर्गा हज़रत शहिंशाहवली रहमतुल्ला अलैह येथून निघून कंकालेश्वर मंदीर, रविवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, जुनी भाजी मंडई, बुंदलपुरा, राजुरी वेस, बशीरगंज, जुने एस.पी. ऑफिस, रिपोर्टर भवन, गुलजारपुरा, अज़ीज़पुरा, कागदी वेस मार्गे कादर पाशा मस्जीद जुना बाजार येथे दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. नमाज़ ए जोहर नंतर सलाम, फ़ातेहा तबर्रुक़ चे वाटप करून जुलूस ची सांगता होईल. यानंतर हजरत शहंशाह वली दर्गा येथे लंगर ए आम जेवण चे आयोजन करण्यात आले आहे भाविक भक्तांनी जुलूसनंतर जेवणासाठी सुद्धा उपस्थित रहावे असे आवाहन केजीएन ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष सय्यद जहिरोद्दीन कादरी व अकबर खान गुलमोहम्मेद खान यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. , हूमेर खान, नासेर खान, रफिक भाई, मिन्हाजभाजभाई मुसभाई जावेदभाई इनामदार, मस्जिद चंदामा, मोमीनपुरा,फेरोजबाबा नदीम बागवान, वसीम बागवान, डॉ. मोईन, सय्यद तालेब, शेख मतीन, शेख हारून, अर्सलसाबरी नौशाद कादरी, मुंताजीब जमा सय्यद वाजेद जाफर चंदा शहा दर्गा सय्यद पाशाबाई, अस्लम खान, शकील खान, कलीम राज, मतीन इनामदार मोहसीन इनामदार सलीम पेंटर हरून पटेल, दर्गा शहिंशाहवली, मासोरी मन्सूर भाई, शेख आमेर, बशीर सय्यद, तौसीफ़ इलाही उर्फ सोनू, मोमीन समीर, मोमीन नाहिद, मस्जिद फातेमा व इतरांनी या मिरवणूक व जेवणावळीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केजीएन ग्रुप सिरत कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.