चालू वर्षात बँकेला ऑडिटचा ‘ब’ वर्ग मिळाला
By MahaTimes ऑनलाइन |
बीड- चालू वर्षात बँकेला ऑडिटचा ब वर्ग मिळाला आहे व बँक आज रिझर्व बँकेच्या संपूर्ण कायद्याप्रमाणे चालत आहे. बँकेचा NPA मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. बँकेने रिझर्व बँकेच्या सर्व नियम व अटी पूर्ण केलेल्या असून बँक लवकरच पूर्वपदावर येईलच यात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही. द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी सांगितले.

द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची ६१वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी गत अहवाल वर्षात ज्या वसुली अधिकाऱ्यांनी चांगले काम केले अश्या आस्वले सतीश, कुलकर्णी संतोष, शर्मा गोविंद या ३ वसुली अधिकारी व त्यांच्या सहकार्यांना सर्व संचालकाच्या सहभागातून ७००० रुपये रोख बक्षीस व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले व यावर्षी १६ पथके तयार केले असून प्रत्येक कर्मचाऱ्यास ८ ते १० खाते नेमून दिले आहेत आणि त्यामुळे वसुलीस वेग आला असून थकीत कर्जावर कलम १०१ ची कार्यवाही, सेक्युरिटायझेशन ची कार्यवाही, १३८ च्या केसेस, कर्जदार व जामीनदार यांचे इतर बँकेतील खाते गोठवणे, कलम ९१ ची कार्यवाही मोठ्या प्रमाणात चालू आहे. कर्जाची रक्कम न भरलेल्या थकीत कर्जदारावर स्थावर व जंगम मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याची कार्यवाही करत आहोत. बँकेची अहवाल वर्षात जवळपास ४४ कोटी वसूली झाली आहे. परंतु, दुर्दैवाने बँकेचे नियमित असलेले कर्ज खाते बंद होत असल्यामुळे व्याजाचं उत्पन्न कमी होत चालले आहे.
यावरही विनम्रपणे अध्यक्ष साहेबांनी सांगितले की, बँकेकडे एकूण निधी ८६ कोटी ८२ लाख आहे. तर राखीव निधी १५ कोटी १८ लाख आहे, इमारत निधी २ कोटी ७१ लाख आहे, बुडीत व संशयित निधी ४९ कोटी ८८ लाख आहेत. बँकेकडे गतवर्षी ९ कोटी ५८ लाख एवढे भागभांडवल होते. तांत्रिकदृष्ट्या बँक पूर्णतः सक्षम होण्यासाठी भाग भांडवल वाढवण्याची गरज होती. त्यामुळे संचालक मंडळाने सभासदांना आवाहन केले की, आपण बँकेचे शेअर्स घ्यावेत, त्यास बँकेच्या सभासदांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व अवघ्या तीन महिन्यात रु.१० कोटी ६९ लाख भाग भांडवल बँकेकडे जमा झाले व बँकेचे एकूण वसुल भाग भांडवल रु.२० कोटी २८ लाख झाले. तीन महिन्यात भाग भांडवलात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली असे डॉ. आदित्य सारडा यांनी सांगितले. रिझर्व बँकेच्या परिपत्रक, नियमानुसार बँकेचे सी. आर. ए. आर. चे प्रमाण ९% असल्यास बँक उत्तम आहे असे म्हटले जाते. आनंदाची गोष्ट म्हणजे बँकेचे सी. आर. ए. आर. चे प्रमाण हे १७.३७ टक्के एवढे आहे व बँकेने रिझर्व बँकेच्या सर्व नियम व अटी पूर्ण केलेल्या असून बँक लवकरच पूर्वपदावर येईलच यात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही. असेही याप्रसंगी श्री आदित्य सारडा यांनी सांगितले.
शेवटी आभार प्रदर्शन बँकेचे संचालक श्री. संतोष लहाने यांनी केले. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष श्री. शुभम चितलांगे, श्री. सि.ए. गिरीशजी गिल्डा, श्रीमती डॉ.आदिती सारडा, श्रीमती अंजली पाटील, श्री. डॉ.अरुण मुंडे, श्री. रघुनाथ चौधरी, श्री. राहुल खडके, श्री. दिनेश देशपांडे, श्री. शेख मोहम्मद सलीम, श्री. प्रल्हाद वाघ, श्री. सुधाकर वैष्णव, श्री. राम गायकवाड, श्री. सतीश धारकर इ.उपस्थित होते सूत्रसंचालन बँकेचे प्र.मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. शफियोद्दीन हिसामोद्दीन मोमीन यांनी केले याप्रसंगी बँकेचेअसंख्य सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बँकेची आर्थिक स्थिती सक्षम
मार्च २०२३ मध्ये बँकेकडे ठेवी १२२ कोटी ४२ लाख ८९ हजार वर होत्या तर बँकेकडे विविध खात्यात गुंतवणूक १११ कोटी ४२ लाख ५३ हजार वर आहेत. त्यामुळे बँकेकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहेत. ठेवी व बँकेकडे असलेली शिल्लक यांची वजा बेरीज केली असता बँकेला फक्त जवळपास ११ कोटी रुपयेच ठेवी परत करण्यासाठी लागतात पण बँकेचे कर्ज येणे रुपये 109 कोटीच्या पुढे आहेत. बँकेची आर्थिक स्थिती किती सक्षम आहे. कोणाला विचारण्याची गरजच नाही असे डॉ. आदित्य सारडा म्हटले.
