अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश ४ बीड मा. श्री आर. एस. पाटील यांचा महत्वपूर्ण निकाल
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : सामुहीक ढोलकीच्या वादातुन ३ ऑक्टोबर २०१४ रोजी मारहाण करून तुकाराम भाऊ माळी रा. इरगाव, ता. गेवराई याचा खुन केला व एकजनास जखमी केल्या प्रकरणी मा. आर. एस. पाटील, अति, जिल्हा व सत्र न्यायाधीश – ४ बीड यांनी आरोपी महादेव लक्ष्मण पवार, बाळू उत्तम माळी, बाळू लक्ष्मण पवार, भागवत सखाराम माळी, भीमा उत्तम माळी, धर्मराज उत्तम माळी, बबन उत्तम माळी, येणूबाई लक्ष्मण पवार सर्व रा. इरगाव, ता. गेवराई जि. बीड यांना कलम ३०२,३२४, १४८, १४९ भा.द.वि प्रमाणे दोषी ठरवुन जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.

थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी व मयत तुकाराम भाऊ माळी यांच्यात सामाईक ढोलकी होती व नवरात्राचे गाणे म्हणण्यासाठी दि. २ ऑक्टोबर २०१४ रोजी मयत तुकाराम यांनी आरोपी धर्मराज माळी याच्या घरून सदर ढोलकी आणली. संध्याकाळी मयत व साक्षीदार हे सर्व नवरात्र चालु असल्याने ढोलकीवर देवीचे गाणे म्हणत असताना रात्रीचे ८.०० वा यातील काही आरोपींनी मयताच्या घरी येऊन यातील मयत यास आमचे घरून ढोलकी का आणली असे म्हणून ढोलकी हिसकाऊन घेऊ लागले तेव्हा मयत तुकाराम माळी यांनी आरोपीस आज गाणे म्हणू दया तूम्ही उद्या म्हणा असे म्हणताच त्या आरोपींनी मयतास शिवीगाळ करून चापटा बुक्क्याने मारहान केली. दुसरे दिवशी दि. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी ६.०० वा. यातील आरोपी येणूबाई हि मयताच्या घरासमोर आली व रात्रीच्या भांडणात तिच्या मुलाचा / सहआरोपी महादेव याचा मोबाईल तुमच्या दारात पडला तो तुम्ही दया असे म्हणाले वरून मयत याने मोबाईल दारात पडला नाही असे म्हणताच ती मोठमोठयाने ओरडू लागली, तीच्या ओरडण्याच्या आवाजाने इतर आरोपी हे पळतच मयताच्या घरी आले व त्यांच्यापैकी एका आरोपीने त्याच्या हातातील बाभळीचे लाकडाने जिवे मारण्याच्या उद्देशाने तुकाराम याचे डोक्यात, मानेवर, कमरेवर मारले व त्यामुळे मयत जखमी होऊन बेशुद्ध पडला तेव्हा मयताचा मुलगा/जखमी साक्षीदार हा मयताकडे जात असताना एका आरोपीने त्याच्या हातातील काठीने साक्षीदाराच्या डोक्यात मारले त्यामुळे साक्षीदाराचे डोके फुटुन रक्त निघु लागले. तेव्हा साक्षीदाराचा आवाज ऐकून साक्षीदाराची पत्नी व भावजई तेथे आल्या असता त्यांनादेखील काही आरोपींनी शिवीगाळ करून चापटाने मारहाण केली. त्यानंतर यातील साक्षीदार हे जखमी तुकाराम माळी व दुसरा जखमी यास उपचारासाठी बीड येथे घेउन आले व तेथुन जखमी तुकाराम माळी यास औरंगाबाद येथे घेउन जात असतांना तो मरण पावला.
त्यानंतर प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी ए.एस.आय ए.डी. सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरन १९७/२०१४ कलम ३०२,३२४,१४३, १४७, १४८, १४९,५०४ भा.द.वि सह कलम १३५ मु.पो. कायद्याप्रमाणे गेवराई पो स्टे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास गेवराईचे सहा. पोलिस निरीक्षक हमीद शेख चांद व सहा. पोलिस निरीक्षक आर. ए. तळेकर यांनी केला. तपासादरम्यान सदरच्या गुन्हयात काही आरोपींना अटक करण्यात आली. तपासा नंतर आरोपी क्रं. १ ते ८ विरूद्ध मा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, गेवराई यांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले व नंतर सदरचे प्रकरण सत्र न्यायालय, बीड येथे वर्ग करण्यात आले.सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर. एस. पाटील यांच्या समोर झाली. सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाचे वतीने १३ साक्षीदार पडताळण्यात आले.
सदर प्रकरणात फिर्यादी, जखमी साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, इतर परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय पुरावा यांचे अवलोकन करून व जिल्हा सरकारी वकिल अजय दि. राख यांचा युक्तिवाद ग्राहय धरून मा. जिल्हा व अति सत्र न्यायाधीश श्री. आर. एस. पाटील यांनी प्रकरणातील आरोपी क. १ ते ८ यांना कलम ३०२ भादवी प्रमाणे दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रु. दंड व दंड न भरल्यास दोन वर्ष सश्रम कारावास तसेच कलम ३२४ भादवी प्रमाणे प्रत्येकी १ वर्ष सश्रम कारावास व कलम १४८ भादवी नुसार ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अजय दि.राख यांनी काम पाहिले. त्यांना सदर प्रकरणात पैरवी अधिकारी पी.एस.आय. बी.बी. जायभाये, ग्रेड पी. एस. आय जाकेर सय्यद, स. फौ. एम. बी. मिसाळ, महिला पोलिस अमलदार एस. ए. चव्हाण व डी.इ. दळवी यांनी सहकार्य केले.