बीड-परळी मार्गावरील बकरवाडी फाटा येथे घडला अपघात
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनर ने समोरून येणाऱ्या रिक्षास जोराची धडक दिली. या भीषण अपघातात आईसह दो मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचालक पती गंभीर जखमी झाला. हा अपघात बीड-परळी मार्गावरील ढेकणमोहा पासून जवळच असलेल्या बकरवाडी फाटा येथे रविवारी रात्री घटना.

शहरातील मामीनपुरा (राजू चौक) येथील रहिवाशी असलेले अजीम शेख हे रविवारी सकाळी आपल्या रिक्षा ने पत्नी व दो मुलांसह सासुरवाडी असलेल्या थेटे गव्हाण (ता. धारूर ) येथे गेले होते. रात्री ते बीड कडे परतत असतांना त्यांच्या रिक्षाला (एमएच 20 एफएफ 0312) समोरून येणाऱ्या कंटेनरने (एम. एच. 12. आरएन 0873) जोराची टक्कर मारली. या अपघातात यामध्ये नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान शेख (वय 13) आणि अदनान शेख (वय 12) हे तिघे जागीच ठार झाले. तर रिक्षाचालक अजीम शेख हे गंभीर स्वरु पात जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बीडच्या काकू नाना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पिपळनेर पोलिस ठाण्याचे एपीआय कैलास भारती आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी पोहचले. या घटनेमुळे शेख परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.