By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी सन २०२३-२४ या वर्षाकरीता तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. आताच सुट्टया जाहीर केल्याने नवीन वर्षातील राज्य सरकारने घोषित केलेल्या इतर सुट्टया किंवा सलग सुट्टी घेऊन कामाचे किंवा पर्यटनाचे नियोजन करता येणार आहे.

तिसरा श्रावण सोमवार सोमवार, ४ सप्टेंबर २०२३, जेस्ठ गौरी पूजन शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३. तसेच धनत्रयोदशी शुक्रवार, १० नोव्हेंबर २०२३ असे तीन दिवस बीड जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्हयातील शासकीय कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था इत्यादी यांना (राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय शासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालय वगळून) लागू राहतील.
राज्य सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्या
राज्य सरकारने सन २०२३ सालासाठीच्या यापूर्वीच जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या मध्ये गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर मंगळवार, ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर गुरुवार, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर सोमवार, दसरा २४ ऑक्टोबर मंगळवार, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १२ नोव्हेंबर रविवार, दिवाळी (बलिप्रतिपदा) १४ नोव्हेंबर मंगळवार, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर सोमवार, ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवारी सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. भाऊबीज, बुधवार दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम तसेच महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी अतिरिक्त सुट्टी राहणार आहे.
