शिक्षकासह अज्ञात व्यक्ती विरोधात एफआईआर दाखल, शिक्षक अटकेत,
जनतेने शांतता बाळगावी-डीवायएसपी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरातील महाविद्यालयातील एका बेंचवर धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा प्रकार आज उघडकीस आला. या घटनेने महाविद्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी एका शिक्षकासह अज्ञात व्यक्ती विरोधात शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन शिक्षकास अटक करण्यात आली आहे.
दो समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य शहरातील नामांकित के.एस. के महाविद्यालयात घडल्याने अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच गुन्हा दाखल करीत शिक्षकास अटक देखील केल्याने जमाव शांत झाला.
बीड शहरातील केएसके महाविद्यालयात आज जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे कॉलेजमधील सर्वच शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते, याचाच फायदा घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणाने महाविद्यालयातील एका बँचवर आक्षेपार्ह मजकूर लिहिला, ही घटना वाºयासारखी सर्वत्र पसरल्यानंतर केएसके कॉलेज याठिकाणी व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमा झाला होता. याची माहिती पोलीसांना मिळताच दोन्ही ठिकाणी पोलीसांनी धाव घेत जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले.
जनतेने शांतता बाळगावी-डीवायएसपी
बीड शहरातील के.एस. के कॉलेज मधील घटनेप्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याचे कारणावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधित व्यक्तीस अटक करून पोलीस प्रशासनातर्फेकठोर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील जनतेने शांतता बाळगावी. कोणत्याही अफवाना बळी पडून कायद्याचे उल्लंघन करू नये असे आवाहन पोलिस उप अधीक्षक संतोष वाळके यांनी केले आहे.