By MahaTimes ऑनलाइन |
बीड : आयेशा टूर्सचा 90 यात्रेकरूंचा जत्था ( ग्रुप ) 15 दिवसासाठी ( मोहर्रम उमराह सीजन) 30 जुलाई रोजी मुंबईहून जेदाह कडे रवाना झाला. यात बीड जिल्ह्यातील 35 यात्रेकरूंचा समावेश आहे. अशी माहिती मॅनेजर मोमीन मोहसीन यांनी दिली.
रविवारी आयेशा टूर्सचे मॅनेजर साजिद खान यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधव पवित्र मक्का-मदीना Makka madina येथे उमराहसाठी यात्रेकरू umrah pilgrimage रवाना झाले. उमराह यात्रेला जाणाऱ्या बांधवांचे नातेवाईक व मित्र परिवाराने पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. रविवारी, 30 जुलै रोजी रवाना झालेला जत्था 15 ऑगस्ट रोजी परतणार आहे.
2017 पासुन हाजी बांधवांची सेवा करणाऱ्या टूर्स ची निवास व्यवस्था हरम शरीफ पासुन तिनशे मिटर अंतरावर व मदीना शरीफ मध्ये ही जवळच आहे. उमराह करण्यासाठी गेलेल्या बांधवांना आयेशा टूर्स Ayesha tours तर्फे सर्व सुविधा आणि सर्व व्यवस्था नियोजित असते. मुस्लिम बांधव आयेशा टूर्स मार्फत हज व उमराहसाठी प्राधान्य देऊ लागले आहे.