भर पावसात शुभेच्छांची अतिवृष्टी, सामान्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
भविष्यातही रुग्णसेवेसाठी कटिबद्ध – डॉ. येवले, डॉ. तोष्णीवाल, डॉ. ठोंबरे, डॉ. केदार
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चा दशकपूर्ती व नुतनवास्तुत स्थलांतर सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. भर पावसात ही सामान्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी हजेरी लावत शुभेच्छांची अतिवृष्टी अनुभवास मिळाले. हॉस्पिटलच्या वतीने डॉ. संदीप येवले, डॉ. रोहित तोष्णीवाल, डॉ. शशिकांत ठोंबरे, डॉ. श्रीकांत केदार येणाऱ्या मान्यवरांच्या शुभेच्छांचा आदराने स्वीकार करीत मन:पुर्वक आभार मानले.
आरोग्य सर्वांसाठी.. सर्वांच्या आरोग्यासाठी..! हे ब्रीदवाक्य घेऊन दर्जेदार रु ग्ण सेवा देण्यासाठी मागील दहा वर्षांपूर्वी (दि. 28 जुलै 2013) रोजी शहरातील भाजी मंडई परिसरात स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरु वात केली होती. मागील दहा वर्षांमध्ये रूग्ण हाच परमेश्वर समजुन विविध अवघड शस्त्रक्रि या, आरोग्य तपासणी शिबिरातून सर्वसामान्य रु ग्णांना न्याय मिळवून देत केवळ रु ग्णांच्या चेहर्यावर हसू पुरविण्याचे कार्य केले.
या प्लास्टिक सर्जरी शिबिरातून अनेक रुग्ण ठणठणीत होऊन उत्तम आरोग्य जगत असून ज्या रुग्णांना बीड येथे शस्त्रक्रि या करणे शक्य नव्हते त्यांना जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे शस्त्रक्रिया शिबिरासाठी पाठवण्यात आले. तसेच कोरोना महामारीच्या काळातही मानवता धर्म जागृत ठेवण्याचे काम स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही सर्व डॉक्टर्स तसेच दवाखान्यातील सर्व कर्मचार्यांनी एक मनाने आजपर्यंत केले असून भविष्यातही जास्तीत जास्त रु ग्णांची सेवा करण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत.
आपण सर्वांनी दिलेल्या सदिच्छा, शुभेच्छा आणि मार्गदर्शनामुळे आम्ही अविरतपणे रुग्णसेवा देत आहोत. आज शुक्रवार दि. 28 जुलै रोजी आपण दशकपूर्ती सोहळा व आपले हे हॉस्पिटल नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित झाले. यापुढेही आपणा सर्वांचे प्रेम आणि मार्गदर्शन टीम स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला मिळत राहणारच आहे.
या प्रेमाचे उतराई म्हणून आम्ही रु ग्णालयाच्या दशकपूर्ती निमित्त नवीन वास्तूमध्ये स्नेहभोजन आयोजित केले होते. आपण सर्वांनी आज शुक्रवार, 28 जुलै रोजी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्यावरील प्रेम असेच वृद्धिंगत करीत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली त्याबद्दल आम्ही सर्व दवाखाना परिवार स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशिलटी हॉस्पिटल, स्व. बाळासाहेब ठाकरे नगर, सेंट अँन्स स्कूल जवळ, जालना रोड, बीड. आपल्या शहराची व भरपूर विश्वासाची साखळी अशीच घट्ट व्हावी व आपल्या समस्त कुटुंबीयांना भरपूर आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.