जिल्हाभरात मंत्री पदाचा जल्लोष, परळीत रेकॉर्ड ब्रेक सभा होणार
परळीत मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सेना भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ते गुरुवारी बीड जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कड्यापासून ते परळी पर्यंत किमान शंभर ठिकाणी मुंडेंच भव्यदिव्य स्वागत करण्याची तयारी सुरू आहे. परळीत मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा भरात त्यांच्या सत्काराची जोरदार तयारी करण्यात आली असून बालाघाटवर कार्यकत्यांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात येणार आहे. परळी शहर आणि त्याच बरोबर बीड शहरही त्यांच्या स्वागताच्या फलकांनी गजबजून गेले आहे. जिल्ह्याला पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी मंत्री मिळाल्याची भावना जिल्हा वासियांची झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष राज्याच्या सतत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुडे यानी कैबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात आज प्रथमच यत असून या निमित्ताने परळी वैद्यनाथ येथे सायंकाळी भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेच्या निमित्ताने परळी वेद्यनाव शहरात पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक गर्दाी होणे अपेक्षित आहे? कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे आज दि. १३ रोजी सकाळी लवकर मुंबई येथून निघून १९ वा. आष्टीतालुक्यातील कडा येथे पोचतील, कड्यासून राष्ट्रवादी काँग्रेसच आष्टी-पाटोदा-शिरूर कासार मतदारस्थान आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर आबा चव्हाण, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह (बाळा) बांगर यांच्या पुढाकारातून पदाधिकारी व कार्यकत्यांनी धनंजय मुंडे यांच्या स्वागत-सत्काराची जोरदार तयारी केलेली पाहायला मिळत आहे.
धनंजय मुंडे यांच्या आगमनानंतर आष्टी मतदारसंघाच्या वतीने आ.बाळासाहेब काका आजबे याच्यासह समर्थकांच्या वतीने कड़ा, आष्टी येथे जोरदार स्वागत करण्यात येईल, त्यानंतर धनजय मुंडे हे जामखेड मार्गे पाटोदा येथे जाणार आहेत. पाटोदा येथे आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी धनंजय मुंडे यांचे पाटादा शहरात विविध ११ ठिकाणी भव्य स्वागत आयोजित केले आहे. पुढे मांजरसुंबा येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बप्पा शिंदे यांचे स्वागत झाल्यानंत बीड शहरात आगमन होईल, बीड येथे बीड व शिरूर कासार तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व अन्य विविध स्थळी स्वागत-सत्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड नंतर बडवणी येथे ही जोरदार स्वागत होईल, तसेच तेलगाव येथे ज्येष्ठ नेते आ. प्रकाश सोळंके यांची सदिच्छा भेट व सत्कार घेऊन, धारूर, केज येथे बजरंग बप्पा सोनवणे व सहकाऱ्यांचा तर अंबाजोगाई येथे राजकिशोर मोदी यांच्यासह सहकाऱ्यांच्या स्वागताचेही नियोजन करण्यात आल आहे. या मार्गाने धनंजय मुंडे हे परळीत दाखल होतील.
भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभा
सायंकाळी ६ वा. नाथ रोडवरील यात्रा मैदानात भव्य सत्कार व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहतील. दरम्यान नेहमीप्रमाणे किंवा यावेळी त्यापेक्षाही अधिक उत्साहाने ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बताने धनंजय मुंडे यांच्या आगमनानंतर स्वागताची व जाहीर समेची जय्यत तयारी ब परळीत दिसून येत असून परळीकर आपल्या लाडक्या नेत्याच्या मंत्री पदाचा जल्लोष पुन्हा एकदा दिवाळी साजरी करून करतील, असे चित्र आहे.
Advt:

