अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पवारांसह राष्ट्रवादीचे 9 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शरद पवार आणि अजित पवारांच्या पाठिशी कोण कोणते आमदार?
By MahaTimes ऑनलाइन |
मुंबई : अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी या पाठिंब्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे निश्चित झाले. राष्ट्रवादीचा पक्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये विभागला गेल्याचं स्पष्ट झाले. बहुतांश आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे समोर आलेय. शरद पवार यांनीही याविरोधात दंड ठोठावत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे कोण कोणते आमदार आणि खासदार आहेत पाहूयात
अजित पवारांसोबत असलेले आमदार
- छगन भुजबळ
- दिलीप वळसे पाटील
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- आदिती तटकरे
- संजय बनसोडे
- अनिल पाटील
8.धर्मरावबाबा आत्राम
9.किरण लहमाटे - निलेश लंके
- दौलत दरोडा
- मकरंद पाटील
- अतुल बेनके
- सुनिल टिंगरे
- इंद्रनील नाईक
- अशोक पवार
- अण्णा बनसोडे
- सरोज अहिरे
- बबनदादा शिंदे
- यशवंत माने
- नरहरी झिरवळ
- दत्ता भरणे
- शेखर निकम
- दीपक चव्हाण
- राजेंद्र कारेमोरे
- नितीन पवार
- मनोहर चंद्रिकापुरे
- संग्राम जगताप
- राजेश पाटील
- सुनील शेळके
- दिलीप मोहिते
विधानपरिषदेचे आमदार कोणते ?
- रामराजे निंबाळकर
- अमोल मिटकरी
- शशिकांत शिंदे
अजित पवारांसोबत खासदार कोणते ?
- सुनिल तटकरे
- अमोल कोल्हे
- प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)
शरद पवारांसोबत कोणते आमदार ?
- जयंत पाटील
- जितेंद्र आव्हाड
- रोहित पवार
4.राजेश टोपे
5.प्राजक्त तनपुरे
6.अनिल देशमुख - सुनिल भुसारा
- सुमनताई पाटील
- संदीप क्षीरसागर
- बाळासाहेब पाटील
- चेतन तुपे
- मानसिंगराव नाईक
पवारांसोबत खासदार कोणते ?
- सुप्रिया सुळे
- श्रीनिवास पाटील
- वंदना चव्हाण (राज्यसभा)
- फौजिया खान (राज्यसभा)
विधानपरिषद आमदार कोणते ?
1.अरुण अण्णा लाड
2.
3.
यांची भूमिका अद्याप अस्पष्ट –
नवाब मलिक
प्रकाश सोळंखे
बाळासाहेब आजबे
आशुतोष काळे
दिलीप बनकर
माणिकराव कोकाटे
चंद्रकांत नवघरे
राजेंद्र शिंगणे (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)
अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन 40 आमदारांसोबत बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. या मोठ्या घडामोडीनंतर आज पुन्हा राज्याच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राज्याला प्रथमच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आश्रम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समाबेश आहे.