डोंगरकिन्ही नजीक टेम्पो व स्कार्पिओची धडक, तीन जण गंभीर जखमी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : भरधाव टेम्पो व स्कार्पिओची समोरासमोर भीषण धडक होवून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. बीड कल्याण महामार्गावर डोंगरकिन्ही नजीक असलेल्या जातनांदूर घोडेवाडी येथे हा अपघात झाला.

बीडकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या टेम्पोने (एमएच-21 बीएच-3820) बीडकडे येणाऱ्या स्कार्पिओला (एमएच-12, एफके 9010) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात जीपमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. मृतामध्ये दोन महिला व दोन पुरु षांचा समावेश असून जखमींना तातडीने बीड जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातील मयतामध्ये सुनिता रमेश हातागळे (वय 28) आश्राबाई काशीनाथ कांबळे (वय 70), रमेश कुंडलीत हातागळे, स्कार्पिओ चालक ताजुद्दीन मुजावर यांचा समावेश आहे. तर दत्ता कुंडलीक हातागळे, सविता दत्ता हातागळे सह तीघे जण गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर बीड जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच अमळनेर पोलीसांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेत अपघातातील मयत व जखमींना तात्काळ बीडच्या रूग्णालयात हलविले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सध्या वाघोली पुणे येथे असलेले हातागळे कुटूंबिय कार्यक्रमासाठी आपल्या गावी कुप्पा, ता. वडवणी येथे येत असताना अपघात झाल्याची माहिती मिळाली.
