मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – शेख निजाम
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : जय हिंद एज्युकेशन कॅम्पस आणि मॅक्स क्यूअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हाजी जैनुद्दीन सेठ मोहल्ला क्लिनिक अँड डे केअर सेंटर चा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. 25) सायंकाळी पाच वाजता शिवसेना बीड जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप ,शामराव पडूळे, मोइन मास्टर सहाब, फारूक पटेल, जावेद भैय्या कुरेशी, शेख बाबु सेठ, रफीक नाशाद, महेबूब खान यांच्या प्रमुख उपस्थितीत व उलेमा ए किराम यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.

आज रविवारी सायंकाळी संपन्न होणाऱ्या हाजी जैनुद्दीन शेठ मोहल्ला क्लिनिक व डे केअर सेंटर च्या माध्यमातून जय हिंद कॅम्पस व शेख निजाम परिवार यांच्या वतीने सामाजिक सेवेचा पुढचा टप्पा पार होणार आहे. या मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर शेख फेरोज व त्यांची टीम सर्वसामान्य रुग्णांची तपासणी व योग्य सल्ला या ठिकाणी करणार आहे. कमी खर्चात औषधोपचार या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे या भागातील गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य विषयीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचा विश्वास शेख निजाम यांनी व्यक्त केलेला आहे.
हाजी जैनुद्दीन शेठ मला क्लिनिक वडेकर सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय हिंद कॅम्पस चे शेख निजाम, डॉक्टर शेख फिरोज, शेख अमर, खय्युम इनामदार, शेख खदिर, अयुब पठाण, हाफिज अशपाक, मोमीन जुबैर यांनी केले आहे.
हा उपक्रम जयहिंद ग्रुप परिवाराच्या सामाजिक सेवेचा पुढचा टप्पा…
बीड शहरात जयहिंद ग्रुप परिवाराच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आधी सर्व सर्वसामान्य नागरिकांना प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न नेहमी शेख निजाम यांच्या माध्यमातून केला गेलेला आहे. मागील अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना उर्दू प्राथमिक शाळा उर्दू माध्यमिक शाळा उर्दू उच्च माध्यमिक शाळा महिला कला महाविद्यालय तंत्र शिक्षण संस्था इंग्रजी प्राथमिक शाळा इत्यादी सर्व शैक्षणिक संकुले हे आपल्या सामाजिक भावनेची जाण ठेवून आर्थिक व सामाजिक दृष्ट्या पछाडलेल्या क्षेत्रांमध्ये चालू करून त्या ठिकाणी गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम जय हिंद एज्युकेशन कॅम्पसच्या माध्यमातून अनेक वर्षांनी घडत आहे. मागील कोरोना महामारीच्या काळात सुद्धा मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन करून त्या ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाच्या भयापासून मुक्त करण्याचे काम व त्यांना योग्य मार्गदर्शन तपासणी व मोफत उपचार करण्याचे कार्य सुद्धा याच जय हिंद कॅम्पसच्या माध्यमातून शेख निजाम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे. हाजी जैनुद्दीन शेठ मोहल्ला क्लिनिक व डे केअर सेंटर च्या माध्यमातून जय हिंद कॅम्पस व शेख निजाम परिवार यांच्या वतीने सामाजिक सेवेचा पुढचा टप्पा पार होणार आहे.
