By MahaTimes ऑनलाइन |
बीड : शहरात प्रथमच आलेले औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची जमीयत उलमा ए हिंद चे प्रदेशाध्यक्ष मौलाना हाफिज मुहम्मद नदीम सिद्दिकी यांनी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन एकादशी व ईद-उल-अज़्हा हे दोन्ही सण हिंदू-मुस्लिम बांधव हे दोन्ही सण गुण्यागोविंदाने साजरे करतील असे आश्वस्त केले. यावेळी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मौलाना नदीम सिद्दिकी यांनी हिंदू मुस्लिम बांधवांना ही दरवर्षीप्रमाणे याही वेळी एकादशी आणि ईद-उल-अज़्हा हे दोन्ही सण आनंदाने गुण्यागोविंदाने व कुठेही कोणताही अनुचित प्रकार न करता शांततेने साजरे करावे असे आवाहन केले तसेच इस्लाम धर्मात पवित्र रमजान ईद नंतर ज्या ईदचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि मानवाने अल्लाह च्या आदेशाचे पालन कसे करावे याची शिकवण सुद्धा ईद-उल-अज़्हा निमित्ताने अधोरेखित होते ती कुर्बानी च्या निमित्ताने. म्हणून इस्लाम धर्मात रमजान ईद सह ईद-उल-अज़्हाला अत्यंत महत्व आहे.
म्हणून मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अज़्हा साजरी करताना आपल्या हिंदू बांधवांच्या एकादशी या सणाची ही आठवण ठेवावी व आपण त्यांच्या सणात आणि हिंदू बांधव आपल्या सणात हर्षोल्लासाने व आनंदाने सामील होतील अशा बंधू भावाने एकादशी व ईद-उल-अज़्हा हे दोन्ही सण गुण्यागोविंदाने साजरे करावे असे आवाहन हाफीज मौलाना मुहम्मद नदीम सिद्दिकी यांनी केले. यावेळी नुमान चाऊस, नाजेम सय्यद, मुदस्सिर सिद्दिकी, सय्यद आसिफ, नासेर चाऊस, मौलाना साद, कारी शमशूद्दीन, सेक्रेटरी मौलाना साबीर, जिल्हाध्यक्ष मुफ्ती अब्दुल्ला, सद्भावना मंचचे अध्यक्ष मुज़्तबा अहेमद खान, उपाध्यक्ष काजी मुजीबुर्रहमान, वाजेद भाई, व्यवस्थापक मुहम्मद पाशा यांची उपस्थिती होती.