राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम : अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोन वेळेस तर शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून एक वेळेस होते आरोग्य तपासणी
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील ९ व परळी तालुक्यातील ५ असे एकुण १४ लाभार्थ्यांना हृदय शस्त्रक्रियेसाठी बालाजी हॉस्पिटल, भायखळा, मुंबई येथे रवाना करण्यात आले. सदरिल लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल, भायखळा, मुंबई येथील प्रिडेंट्रीक कार्डीयोलॉजिस्ट डॉ. मंगेश निबांळकर, श्री प्रतिक मिश्रा सोशल वर्कर व त्यांचा स्टाफ यशस्वी रित्या करणार आहेत.

आरबीएसके कार्यक्रमातंर्गत बीड जिल्हयात एकुण ३९ वैद्यकिय पथके कार्यरत असुन सदरिल पथकामार्फत अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी वर्षातून दोन वेळेस व शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी एक वेळेस करण्यात येते. शाळेतील व अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी केल्या नंतर पुढील तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या आजारा करिता व विविध तपासण्या करिता उपजिल्हा ग्रामीण व जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येत असते. उदा: २ डी ईको तपासणी, बेरा तपासणी, आर. रो. पी. (ROP) तपासणी, ई. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंबाजोगाई येथे दिनांक २ जुन रोजी २-डी ईको तपासणी शिबीर मे लाड मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अंबाजोगाई येथे आयोजीत करण्यात आलेले होते.
मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. ए. साबळे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेख रौफ, मा निवासी वैद्यकिय अधिकारी (बा.सं.) डॉ. राम आवाड, डॉ. तांदळे आर., वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, धानोरा वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय, परळी डॉ. ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्या मार्गदशनाखाली दिनांक २२ जुन रोजी १४ लाभार्थी त्यांच्या पालकासह हृदय शस्त्रक्रिया साठी बालाजी हॉस्पिटल, भायखळा, मुंबई येथे अंबाजोगाई बस आगार येथुन पाठविण्यात आले.
सदर लाभार्थ्यांना हृदय शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल, भायखळा, मुंबई येथे पाठविण्या करिता श्री आर. के तांगडे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक) यांनी मोलाचे परिश्रम घेतले. तसेच अंबाजोगाई तालुक्यातील आरबीएसके अंतर्गत नोडल अधिकारी डॉ. पांडुरंग बोद्रे, डॉ. महेंद्र लोमटे, डॉ, प्रदिप देशमुख, डॉ कमलाकर साखरे, डॉ. सारीका बारहाते, डॉ. स्वाती डॉ. पुजा राजमाने, डॉ. सिमा काशीद, डॉ. दिपाली माहेकर, डॉ. किशोर घुबडे, जावळे, श्री. राहुल शिंदे, नागेश चव्हाण, अमर गालफाडे, श्री. महेश वैष्णव, श्रीमती सोनाली माने, श्रीमती कामिनी केंद्रे, श्रीमती प्रतिभा परळकर, श्रीमती सोनाली सरवदे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
