परळी शहरातील बरकतनगर परिसरातील घटना, अफवांवर विश्वास ठेवू नका – पीआय सलीम चाऊस
By MahaTimes ऑनलाइन |
बीड : परळी शहरातील बरकतनगर रोडवर जुन्या भांडणाच्या कारणावरून तुंबळ हाणामारी ची घटना गुरूवारी (दि. 22) दुपारी घडली. या हाणामारीत शेख अलाउद्दीन (रा. नागापुर ता. परळी) यांचा मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला. सदर घटनेची माहिती समजताच संभाजीनगर ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रु ग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर जुन्यावादातुन दोन गटात हाणामारी झाली. परंतु प्रत्यक्षात मात्र तिघाजणांमध्येच भांडण झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व इतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. सदरचे वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिय सुरू होती.
संभाजीनगर ठाण्याचे निरीक्षक सलीम चाऊस यांनी सांगितले की, नागापूर येथील दोन कुटुंबात असलेल्या खाजगी कारणावरून वाद झाला. याचा आणि लग्नाचा किंवा दोन गटाचा कसलाही संबंध नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका असे ही पीआय चाऊस म्हणाले.